Join us

Bigg Boss Marathi Season 2 : अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांसोबत शेअर केल्या त्यांच्या करिअरच्या जुन्या आठवणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 18:27 IST

ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील अनुभव आपल्यासोबत बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या  स्पर्धकांना सांगितले.

सगळी टास्क पूर्ण करताना तसेच स्ट्रॅटेजीज आणि गेम प्लान्स खेळतानाच बिग बॉसचे स्पर्धक अखेर त्यांच्या व्यावसायिक व व्यक्तिगत आयुष्यांबद्दल गप्पा मारत एकमेकांच्या जवळ येताना दिसू लागले आहेत. वूटच्या ‘अनसीन अनदेखा’ या नुकत्याच आलेल्या क्लिपमध्ये मराठी चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील अनुभव आपल्यासोबत बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या  स्पर्धकांना सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘मी कॉन्व्हेंट शाळेची होते ना, त्यामुळे मराठी इंडस्ट्री खूप नवीन होती माझ्यासाठी. लगेच सुरू झालं ना, म्हणजे एकदम तरुण वयात सुरू झालं. आसपास परिसर नाही किंवा मराठी बोलायची सवय नाही. फार फार तर आपल्या फॅमिलीमध्येच मराठी बोलायची सवय होती. बाकी सगळे नॉन-महाराष्ट्रीयन.’

त्यांनी नंतर ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्या चित्रपटाच्या डबिंगसाठी फोन येईल अशी वाट बघत होत्या. शेवटी त्यांनीच फोन करून विचारले तेव्हा त्यांना कळले की, त्याचा भाग त्यापूर्वीच दुसरं कोणीतरी डब केला होता.

ही घटना त्यांनी आव्हानासारखी स्वीकारली आणि आपले मराठी उच्चार दुरुस्त करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. त्यानंतरचा त्यांचा दुसरा चित्रपट सचिन पिळगावकर यांचा ‘माझा पती करोडपती’ होता. त्यात त्यांनी स्वत:च्याच आवाजात डबिंग केले.

हीच खूण आहे खऱ्या  कलावंतांची! हे सर्व ऐकून वीणा, शिवानी, रूपाली आणि उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले.  

टॅग्स :किशोरी शहाणेबिग बॉस मराठी