Join us  

Bigg boss नंतर विशाल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर; 'या' गाजलेल्या मालिकेत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:09 PM

Vishal nikam:बिग बॉसचा विजेता ठरलेला विशाल निकमच्या पदरात एकही मालिका वा चित्रपट पडल्याचं ऐकिवात नव्हतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडासा नाराजीचा सूर होता.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून विशेष चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे Bigg boss marathi. अलिकडेच या शोचं तिसरं पर्व पार पडलं. मात्र, तरीदेखील त्यातले स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. हा शो संपल्यानंतर मीरा जगन्नाथ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, स्नेहा वाघ या कलाकारांना नवनवीन मालिका, चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बिग बॉसचा विजेता ठरलेला विशाल निकमच्या पदरात एकही मालिका वा चित्रपट पडल्याचं ऐकिवात नव्हतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडासा नाराजीचा सूर होता. परंतु, आता विशालियन्ससाठी आनंदाची बातमी आहे. विशाल लवकरच एका मालिकेत झळकणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विशाल लवकरच एका मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून सध्या सोशल मीडियावर ही एकच चर्चा रंगली आहे.

विशाल लवकरच 'आई मायेचं कवच' या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो मानसिंग ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे विशालला नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 

"बिग बॉस मराठीनंतर अॅक्टिंग पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्याबद्दल आनंद आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर ठरवलं होतं की प्रेक्षकांचे मनोरंजन करेन. आणि आज पहिले पाऊल उचलले आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असे पात्र आहे. आव्हानात्मक आहे. मालिकेत उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. कलर्स मराठीसोबत पुन्हा जोडला जातो आहे या गोष्टीचा आनंद आहे आणि खूप उत्सुक देखील आहे. मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल असाच प्रयत्न असेल माझा आणि तितकी मेहनत मी घेणार हे नक्कीच,” असं विशाल म्हणाला.

दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. 'आई मायेचं कवच' यापूर्वी विशालने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :विशाल निकमटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस