Join us  

"आमची परिस्थिती एकसारखीच", राज ठाकरेंबद्दल अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्यांचे १३ आमदार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 1:58 PM

Khupte Tithe Gupte : Video : अभिजीत बिचुकलेंनी व्यक्त केली मनसेत जाण्याची इच्छा, म्हणाले, “त्यांनी बोलावलं तर....”

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय शोपैकी ‘खुपते तिथे गुप्ते’ हा एक शो आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेतेही सहभागी होतात. आपल्या खुमासदार शैलीने अवधूत या सगळ्यांनाच खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर बोलतं करत असतो. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या दोन सीझनप्रमाणेच तिसऱ्या पर्वालाही पसंती मिळत आहे. या शोच्या नव्या भागात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले सहभागी होणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचा एक प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडिओत अवधूत गुप्ते अभिजीत बिचुकलेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. “राज ठाकरेंबद्दल कोणती गोष्ट खुपते?” असं अवधूत बिचुकलेंना विचारतो. यावर उत्तर देत बिचुकले म्हणतात, “आमच्या दोघांचीही परिस्थिती एकसारखीच आहे. त्यांचे एकेकाळी १३ आमदार आले होते आणि माझं अजून खातं उघडायचं आहे.” बिचुकल्यांनी राज ठाकरेंबद्दल असं विधान करत अवधूत त्यांना “तुम्ही मनसेत प्रवेश का नाही करत?” असं विचारतो.

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

अवधूतच्या या प्रश्नावर बिचुकले आधी मनेसत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत नंतर लगेचच माघारही घेतात. “बोलावल्याशिवाय जाणार नाही”, असं बिचुकले म्हणतात. यावर अवधूत “राज ठाकरे तुम्ही ताबडतोब यांना बोलावून घ्या”, असं म्हणतो. त्यानंतर बिचुकले “मी असं म्हणालोच नाही” असं सांगतात. खुपते तिथे गुप्तेमधील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्...", 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये बिचुकलेंआधी देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितीन गडकरी, राज ठाकरे, संजय राऊत या राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. तर अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे हे कलाकारही सहभागी झाले होते.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारराज ठाकरे