Rupali Bhosale Post: 'बिग बॉस मराठी'चा सहावा (Bigg Boss Marathi 6) सीझन सुरु होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. अशातच या शोमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची (Rakhi Sawant) एन्ट्री झाल्याने घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. त्यानंतर राखीव तिचं घरातील वावरणं असो किंवा टाक्समधली खेळी असो. यामुळे सातत्याने ती चर्चेत येत आहे. दरम्यान, सध्या बिग बॉस मराठीच्या काल झालेल्या भागाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या भागात प्राजक्ता आणि अनुश्रीचं वागणं अनेकांना खटकलं आहे. कन्फेशन रुममध्ये आईच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या राखी सावंतवर त्या हसू लागतात. याप्रकरणी आता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसलने (Rupali Bhosale) प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या घरात कन्फेशन रूममध्ये एक खोटा टेलिफोन ठेवलेला असतो. घरातील प्रत्येक सदस्याने कन्फेशन रूममध्ये जाऊन आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या असतात. यादरम्यान राखी सावंत कन्फेशन रूममध्ये जाते. अभिनेत्री तिच्या आईला फोन लावते. काही वर्षांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं आहे. यादरम्यान, राखी तिच्या आईला फोन लावते आणि ढसाढसा रडू लागते. त्यावर प्राजक्ता आणि अनुश्री हसू लागतात. हा सगळा प्रकार पाहून अनेकांना या दोघींना फटकारलं आहे. आता यावर अभिनेत्री रुपाली भोसलने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली भोसले काय म्हणाली? रुपालीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत अनुश्री आणि प्राजक्ताच्या वागणूकीवर संताप व्यक्त केला आहे. ती म्हणते, "खरंच... अनुश्री-प्राजक्ता? प्राजक्ता तू तर खूप बोलतेस, माणुसकीबद्दल. मग आता कुठे गेली गं? आणि अनुश्री तू खरंच हार्टलेस आहेस का? राखी कॉमेडी करत होती का? अगं मग तू विशालला बाद केलंस तेव्हा का रडलीस? ते ही हसण्यासारखंच होतं. प्राजक्ता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
त्यानंतर अनुश्रीचा कन्फेशन रुममध्ये जाऊन तिच्या बाबांना फोन लावते. हा फोटो शेअर करत रुपालीने म्हटलंय, 'प्राजक्ता आता हस आणि अनुश्री तूही हसत हसत बोल. किती खोटे आहात तुम्ही? एखाद्याचं व्यक्त होणं तुमच्यासाठी मस्करी? आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता ते मात्र खरं... हा विनोद आहे का तुमच्यासाठी?", असं म्हणत रुपालीने अनुश्री आणि प्राजक्ताला खडेबोल सुनावले आहेत.
Web Summary : Rupali Bhosale criticized Anushree and Prajakta for laughing at Rakhi Sawant, who was crying in the Bigg Boss Marathi house while missing her mother. Rupali questioned their humanity and double standards.
Web Summary : रुपाली भोसले ने राखी सावंत पर हंसने के लिए अनुश्री और प्राजक्ता की आलोचना की, राखी बिग बॉस मराठी के घर में अपनी माँ को याद कर रो रही थीं। रुपाली ने उनकी मानवता और दोहरे मानकों पर सवाल उठाया।