Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी पहिला सीझनही केला नसता; 'बिग बॉस'चा होस्ट बदलल्यानंतर मांजरेकर म्हणाले- "रितेशला पाहिल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:22 IST

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : "नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही", असं का म्हणाले महेश मांजरेकर?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसकडून अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळत आहेत. या नव्या सीझनमध्ये 'बिग बॉस मराठी'चा होस्टही बदलला आहे. सुरुवातीचे चार सीझन महेश मांजरेकर यांनी गाजवले. ते वीकेंडला त्यांच्या खास शैलीने स्पर्धकांची शाळा घ्यायचे. पण, यंदाच्या सीझनमध्ये मात्र रितेश देशमुख होस्ट करत असल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी ५' तुम्ही का होस्ट करत नाहिये, याबाबत महेश मांजरेकरांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. 

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. 'बिग बॉस मराठी ५'बद्दल प्रश्न विचारताच ते म्हणाले, "ज्यावेळी मी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली. तेव्हा फक्त एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. होस्ट करायच्या आधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. मला असं वाटायचं की हे काय बघायचं...पण, नंतर होस्ट करायला लागल्यानंतर बिग बॉस पाहिलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा खूप इंटरेस्टिंग खेळ आहे. मग, एकचे दोन, दोनचे तीन आणि तीनचे चार सीझन मी केले".

पुढे ते म्हणाले, "पाचव्या सीझनमध्ये त्यांना खरंच वाटलं असेल की मी रिपीटेटिव्ह होतोय. त्यांना जे हवंय ते कदाचित माझ्यात कमी असेल. पण, जेव्हा मला पहिल्यांदा होस्ट करण्याची संधी दिली होती. तेव्हा मला वाटलेलं की मी का? म्हणजे तेव्हाही खूप स्टार्स होते. त्यामुळे आज रितेशचं नाव ऐकल्यावर मला वाटलं अरे क्या बात है! नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही. तसं असतं तर मी कधीच बिग बॉस होस्ट केलं नसतं. चार वर्ष मी बिग बॉस खूप एन्जॉय केलं. होस्ट बदलायचा की नाही हे त्यांच्या हातात आहे. मी होस्ट करत असल्याने दरवर्षी बिग बॉस बघायचो..कारण मला ते बोलायला लागायचं. पण, मी यावर्षीही तितक्याच आवडीने बघेन. मी जे काही केलंय त्याचा आनंद आहे. मला वाटतं की लोकांनाही बदल हवाय. आणि मलाही तो बघायचा आहे".

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

टॅग्स :महेश मांजरेकर बिग बॉस मराठीरितेश देशमुख