Join us  

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून 'हा' सदस्य पडला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 11:59 AM

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात झाली चार चॅलेंजर्सची एंट्री. त्यांच्या येण्याने खेळात धम्माल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात या आठवड्यात झाली चार चॅलेंजर्सची एंट्री. त्यांच्या येण्याने खेळात धम्माल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता. बिग बॉसच्या चावडीमध्ये प्रेक्षकांना तसेच घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसला जेव्हा महेश सरांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले आणि हे देखील म्हणाले की हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते. तरीदेखील या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर देखील जाणार हे निश्चित. या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदे(Rohit Shinde)ला घराबाहेर पडावे लागले.

 महेश मांजरेकरांनी जेव्हा सदस्यांना विचारले तुमच्या मते कोणता सदस्य वजनदार ठरला ? त्यावर अमृता धोंगडे म्हणाली, अपूर्वा मला कुठेतरी कमी वाटते. त्यावर अपूर्वाचे म्हणणे पडले मी याच्याशी सहमत नाही. अमृता म्हणाली, मान्य न करणे ही मुळात चूक आहे आपण खेळाडू म्हणून उभं केलं आहे इथे आधी मान्य करायला शिका. त्यावर अपूर्वा म्हणाली, तुला सांगायची गरज नाही ते माझं मी बघेन.आरोह, विकास, किरण माने, राखी, स्नेहलता यांनी अमृता देशमुखला वजनदार ठरवले. तर अपूर्वाला भार. मीरा, अक्षय, विशाल यांच्या मते अपूर्वा ठरली वजनदार. प्रसाद आणि रोहित मध्ये अक्षय, स्नेहलता, अपूर्वा, राखी, मीरा, अमृता देशमुख,  यांनी रोहितला वजनदार ठरवले. तर किरण, अमृता धोंगडे यांनी प्रसादला वजनदार ठरवले.

VOOT आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. विकासला Friendship आणि राखी बांधायला सांगितले... अपूर्वाला त्याने friendship बांधला तर राखी मीराने विकासला बांधली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे अमृता धोंगडेला स्नेहलताची चुगली आली आणि त्यावर अमृता भडकली. पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी पाहावा लागेल.
टॅग्स :बिग बॉस मराठी