Join us  

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याला सुरुवात; ९ लाखांची भूरळ आणि स्पर्धक पडले बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 7:58 PM

बिग बॉस ४ या मराठी बिग बॉसचा विजेता किंवा विजेती कोण होणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे. त्यातच आता बिग बॉसने सदस्यांना बुचकळ्यात टाकलं आहे.

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : बिग बॉस मराठी ४ च्या अंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्याआधी स्पर्धकांचे धमाल डान्स परफॉर्मन्सही बघायला मिळत आहेत. किरण माने, अपुर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरशीची लढत आहे. टॉप ५ मधून कोण दोन सदस्य बाहेर पडणार आणि टॉप ३ मध्ये कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्याआधी या सदस्यांची मोठी परीक्षाच बिग बॉस घेताना दिसणार आहेत. ते कसे बघुया 

बिग बॉस ४ या मराठी बिग बॉसचा विजेता किंवा विजेती कोण होणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे. त्यातच आता बिग बॉसने सदस्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. पाचही स्पर्धकांसमोर एक बॅग ठेवण्यात आली आहे आणि त्यात आहेत तब्बल ९ लाख रुपये. ज्यांना हे पैसे हवे असतील त्यांनी समोर येऊन बझर वाजवायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे. हे बघितल्यावर पाचही स्पर्धकांच्या चेहऱ्यावर प्रश्न पडलेला दिसतोय. ९ लाख ही खरं तर खूप मोठी रक्कम आहे माझ्यासाठी असं अपूर्वा नेमळेकर म्हणते. आता या ९ लाखांची भूरळ स्पर्धकांना पडणार का, हे पैसे घेऊन कोणी बाहेर जाणार का हे येत्या काही वेळात कळणार आहे.

'बिग बॉस ४' च्या अंतिम सोहळ्याला दिमाखात सुरुवात झालेली दिसते. सध्या स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सने धमाल आणली आहे. जशी जशी वेळ जवळ येतीये स्पर्धकांच्या मनातली धाकधूक वाढली आहे. येत्या काही वेळात बिग बॉस मराठी ४ च्या विजेत्याची घोषणा होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर कलर्स मराठी