Join us

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये 'कॉमन मॅन'लाही एन्ट्री; 'शो'चा चाहता बनला स्पर्धक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 22:41 IST

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये एक जबरदस्त धक्का देत सर्वसामान्य प्रेक्षकाला स्पर्धक म्हणून दाखल होण्याची संधी मिळाली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये एक जबरदस्त धक्का देत सर्वसामान्य प्रेक्षकाला स्पर्धक म्हणून दाखल होण्याची संधी मिळाली आहे. एअरटेल लकी कॉलर माध्यमातून 'बिग बॉस' या 'रियालिटी शो'चा फॅन असलेल्या त्रिशुळ मराठे याला स्पर्धक म्हणून सहभागी करुन घेण्यात आलं आहे. 

बिग बॉस मराठीत पहिल्यांदाच 'कपल एन्ट्री'; 'माझ्या नवऱ्याची बायको फेम' अभिनेत्रीनं प्रियकरासोबत घेतली एन्ट्री! 

महेश मांजरेकर यांनी त्रिशुळ मराठेची ओळख करुन देताना एअरटेलनं आयोजित केलेल्या लकी कॉलरच्या माध्यमातून निवडगेलेला एक लकी प्रेक्षक अशी माहिती दिली आणि सर्वांच्याच डोळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्रिशुळ मराठेनंही आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. तसंच गेले तीन सीझन हा त्रिशुळ महेशची वाट पाहत भटकत होता. पण आज त्रिशुळ आणि महेश यांची भेट झाल्याचं त्यानं म्हटलं आणि महेश मांजेकरांचं मन जिंकलं आहे. घरात दाखल होताच घरातील सेलिब्रिटी स्पर्धकांनीही त्रिशुळ मराठीचं मनापासून स्वागत केलं. तसंच तो सर्वसामान्य प्रेक्षक असल्याचं समजताच बिग बॉसचं कौतुक केलं. 

एकच 'फाइट' अन् वातावरण टाइट! 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात आजवरचा सर्वात उंच स्पर्धक दाखल!

एका सर्वसामान्य व्यक्तीला बिग बॉसचा स्पर्धक होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले. अर्थात त्रिशुळ आज बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून दाखल झाला असला तरी तो बाहेर येताना सेलिब्रिटी झालेला असेल यात शंका नाही.

टॅग्स :बिग बॉस मराठी