Join us  

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातून कॉमन मॅनची एक्झिट; त्रिशूल मराठे बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 11:19 AM

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे.

 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला आहे. दरम्यान त्रिशूल मराठे (Trishul Marathe) बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. 

एअरटेल लकी कॉलर माध्यमातून 'बिग बॉस' या 'रियालिटी शो'चा फॅन असलेल्या त्रिशुळ मराठे याला स्पर्धक म्हणून सहभागी करुन घेण्यात आलं आहे. महेश मांजरेकर यांनी त्रिशुळ मराठेची ओळख करुन देताना एअरटेलनं आयोजित केलेल्या लकी कॉलरच्या माध्यमातून निवडगेलेला एक लकी प्रेक्षक अशी माहिती दिली आणि सर्वांच्याच डोळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्रिशूल मराठेनंही आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती.

घरात दाखल होताच घरातील सेलिब्रिटी स्पर्धकांनीही त्रिशूल मराठीचं मनापासून स्वागत केलं होतं. तसंच तो सर्वसामान्य प्रेक्षक असल्याचं समजताच बिग बॉसचं कौतुक केलं होतं.

दरम्यान मागच्या काही दिवसांत तो कमी खेळताना दिसून आला. एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे, असं म्हणत मांजरेकरांनी त्रिशूलचा निरोप घेतला.

टॅग्स :बिग बॉस मराठी