Join us

Bigg Boss Marathi 4: सगळं घरी करायचं आपल्या, अपूर्वानं राखीला लगावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:26 IST

ग बॉस मराठीच्या घरात आज होणार आहे ड्युटी वाटप आणि त्याच्यावरून राखीला सदस्य स्वतःच काम स्वतः करण्याचा सल्ला देताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात काल भरलेल्या BB High School मध्ये प्रसादने केलेल्या मिमिक्रीमुळे उडाला मनोरंजनाचा बार... तर अक्षय - प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा. बिग बॉस मराठीच्या घरात आज होणार आहे ड्युटी वाटप आणि त्याच्यावरून राखीला सदस्य स्वतःच काम स्वतः करण्याचा सल्ला देताना दिसणार आहेत. 

अपूर्वाचे म्हणणे आहे, मी आणि अक्षय ब्रेकफास्ट, भांडी, दुपारचं जेवण करू. अक्षयचे म्हणणे आहे, प्रत्येकाने आपआपली भांडी घासायची. त्यावर राखी म्हणाली, मी नव्हती घासत... चपाती - भाजी माझं करावं लागेल आणि माझी भांडी मी नव्हते करत. अपूर्वाचे म्हणणे आहे मी सगळयांची जी होतील ती भांडी घासेन वैयक्तिक भांडी नाही घासणार. 

अमृता धोंगडे म्हणाली, दुपारची भाकरी मी बनवते तुझी. प्रसाद राखीला म्हणाला, जर ती तुझ्यासाठी भाकरी करते आहे तर तुला देखील भांडी घासावी लागणार... तुझी प्लेट तुला घासावी लागणार. अपूर्वा राखीला म्हणाली, हा काय हेकेखोरपणा आहे. राखी म्हणाली, हा हेकेखोरपणा आहे... मी काहीच काम नाही करणार. अमृता देशमुख म्हणाली, तुम्ही धुवू नका तिची प्लेट. तिच्या सगळ्या प्लेट जमा होतील तुझ्या बेडच्या इकडे कळेल मग तुला. अपूर्व म्हणाली, हे सगळं घरी करायचं आपल्या, इकडे नाही करायचे... राखी म्हणाली, हे घर आहे माझं. 

टॅग्स :बिग बॉस मराठी