Join us  

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात आज पुन्हा होणार अमृता आणि अक्षयमध्ये राडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 12:23 PM

काल अमृता धोंगडे आणि अक्षय केळकरमध्ये मेकअप बॉक्स वरून मोठे भांडण झालं होत. आज पुन्हा एकदा त्यांच्यात वादावादी होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास जसजसा पुढे सरकत आहे, तसं तसे अवघड आणि अत्यंत कठीण टास्क पुढे येत आहेत. आता तर सदस्यांना डोकं, ताकद सगळंच वापरावं लागणार आहे. काल अमृता धोंगडे आणि अक्षय केळकरमध्ये मेकअप बॉक्स वरून मोठे भांडण झालं होत. आज पुन्हा एकदा त्यांच्यात वादावादी होणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेवण बनवण्यावरून, बाकीच्या ड्यूटीजवरून भांडणं होताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. जेवण बनवताना किंवा डायनिंग टेबल वर जेवताना भांडू नका असे आपण खूपदा महेश सरांना सदस्यांना सांगताना ऐकले आहे, पण प्रत्येक सिझनमध्ये हे होताना आपल्याला दिसते. आज देखील तसेच काहीसे होणार आहे. अक्षय आणि अमृता धोंगडेमध्ये जेवण बनवण्यावरून वादावादी होणार आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अक्षय अमृताला विचारताना दिसणार आहे, संध्याकाळी पोळ्या बनणार कि नाही ? अमृताचं त्यावर म्हणणं पडलं, माझं अंग खूप दुखतं आहे मी नाही बनवणार. अक्षय म्हणाला, पण नाही बनवणार वैगरे असं नको ना... नाही जमणार असा पण टोन असतो. अमृता म्हणाली, तुझा पण टोन तास होता संध्याकाळच्या टीमने चहा टाका... आम्ही काही तुझ्या घरचे नोकर नाहीये इथं. अक्षय म्हणाला, आम्ही पण तुझ्या घरचे नोकर नाहीये... बोटं वैगरे नको दाखवूस. आता हा वाद अजून किती वाढला ? पुढे काय झालं ? बघूया आजच्या भागात.

टॅग्स :बिग बॉस मराठी