Join us

Bigg Boss Marathi 4 : हळव्या मनाची 'उंची'! हिंदीत अब्दू तर मराठीत विकास सावंत घराबाहेर; मांजरेकरांनाही अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 11:02 IST

Bigg Boss Marathi 4 Elimination: 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट याचं परिपूर्ण पॅकेज. आता हिंदी आणि मराठी 'बिग बॉस' शो एकाच वेळी सुरू आहेत.

Bigg Boss Marathi 4 Elimination: 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट याचं परिपूर्ण पॅकेज. आता हिंदी आणि मराठी 'बिग बॉस' शो एकाच वेळी सुरू आहेत. दोन्ही कार्यक्रमांना चाहत्यांचा दमदार प्रतिसादही मिळत आहे. या आठवड्यात 'बिग बॉस'च्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही शोमध्ये एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. मराठी 'बिग बॉस'मध्ये विकास सावंत तर हिंदी 'बिग बॉस'मध्ये अब्दु रोजिक हे दोघंही 'छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखले जात होते. पण या आठवड्यात दोघंही घराबाहेर गेल्यानं चाहते भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

विकास सावंत आणि अब्दु रोजिक यांना चाहत्यांची चांगली पसंती मिळत होती. दोघंही घरात मनोरंजनाच्या बाबतीत अव्वल दर्जाचे कलाकार म्हणून आपलं स्थान पक्कं करुन होते. पण काल मराठी बिग बॉसमध्ये डबल एलिमनेशनचा धमाका महेश मांजरेकर यांनी केला आणि शनिवारीच एक स्पर्धक घराबाहेर पडला. यात विकास सावंत याचा स्पर्धेतील प्रवास काल संपुष्टात आला. विकास सावंतनं घरात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकरसोबत एक खास नातं निर्माण केलं होतं. विकास घराबाहेर पडत असताना दोघंही प्रचंड भावूक झालेले पाहायला मिळाले. किरण आणि विकास यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून विस्तव जात नसला तरी विकास घराबाहेर जात असल्याचं जाहीर होताच माने यांना रडू कोसळलं. घराबाहेर जात असताना विकासनं किरण माने यांची गळाभेट घेतली आणि दोघंही खूप रडताना पाहायला मिळाले. यात महेश मांजरेकर यांचेही डोळे भरुन आले होते. 

Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू

बिग बॉस मराठीच्या फायनलला अवघे २१ दिवस शिल्लक असताना विकास सावंतची घरातून एग्झिट झाली आहे. पण ज्या विकास सावंतच्या बाबतीत सुरुवातीला घरात याचा कितपट टिकाव लागेल अशी शंका उपस्थित केली जात होती. त्याच विकास सावंतनं घरात ७० हून अधिक दिवस काढले याचा अभिमान चाहते व्यक्त करत आहेत. 

दुसरीकडे अब्दु रोजिक या अवलियानं हिंदी बिग बॉसच्या माध्यमातून सर्वांचं मनं जिंकली. त्याचं निर्मळ मन आणि वागणं चाहत्यांना भावलं होतं. अब्दुची सोशल मीडियात याआधीपासूनच प्रचंड फॅन फॉलोइंग होतीच. पण बिग बॉसच्या घरातून तो प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. आता त्यालाही घराबाहेर पडावं लागलं आहे. अब्दुच्या घराबाहेर जाण्यानं बिग बॉसच्या घरात निराशा पाहायला मिळाली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. यातच अब्दुनं घरातील सदस्यांच्या मनात निर्माण केलेलं स्थान किती महत्वाचं होतं ते दिसून आलं. 

टॅग्स :बिग बॉस मराठी