बिग बॉसच्या घरात गेल्यापासून किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यावर टीका होताना दिसत आहे. सुरूवातीचे काही दिवस ती बिग बॉसच्या घरात राहिली मात्र दुसऱ्याच आठवड्यात तब्येत बिघडल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसने देखील तिच्या या निर्णयावर आपले मत दर्शवत तिला घरातून उपचारासाठी बाहेर निघण्याची परवानगी दिली. उपचार घेतल्यानंतर शिवलीला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र तिने शो सोडत असल्याचे सांगितले.
किर्तनकार शिवलीला पाटीलचा एक व्हिडिओ बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला. त्यात तिची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे तिने सांगितले. अजूनही आजारातून बरे वाटत नसल्याने मी बिग बॉसचा शो सोडत आहे, असा ठोस निर्णय तिने घेतला.
शिवलीलाच्या या निर्णयाचे प्रेक्षकांनी स्वागतच केले मात्र आजारी असलेली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली शिवलीला आता चक्क किर्तन कशी काय करू शकते? असा सवाल अनेकांना पडला आहे. या संदर्भातला एक फोटो सध्या तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोमध्ये कै. लता राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजेच आज मंगळवारी समाजप्रबोधनकार ह. भ. प. शिवलीला ताई पाटील आता चक्क किर्तन करणार आहेत. एकीकडे आजारी असल्याचे कारण सांगून शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली मात्र दुसऱ्याच क्षणी त्या किर्तन करण्यासाठी सज्ज कशा? असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.