Join us  

Bigg Boss Marathi 3 : पहिल्याच दिवशी फुल्ल राडा, टॉवेलवरून घरात झालं पहिलं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:28 AM

Bigg Boss Marathi 3 : पहिल्याच दिवशी मीरा आणि जयमध्ये का बरं झाली असेल बाचाबाची? पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देघरातील पहिला आठवडा महिलांच्या नावावर करण्यात आला आहे. अर्थातच सुरुवातीलाच घरात महिला राज्य दिसून येणार आहे.

बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss Marathi 3)  15 कलाकारांनी ग्रॅण्ड एन्ट्री झाली आणि पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या या घरात फुल्ल राडा झाला. होय, अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath)आणि ‘स्पिलिट्सविला’ फेम  जय दुधाने (Jay Dudhane) आपसातच भिडले. पहिल्याच दिवशी हा धमाका पाहून प्रेक्षकही थक्क झालेत. मीरा व जय यांच्या वाद कशामुळे झाला तर एका टॉवेलमुळे. होय, प्रवेश केल्यानंतर पहिल्या आठवड्यासाठी बिग बॉसमधील प्रत्येक कलाकाराला वेगवगेळे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या आठवड्यासाठी मीराला बेडरूमचा अधिकार देण्यात आला आहे. बेडरूमची स्वछता, बेडरूमचे हक्क मीराकडे आहेत. साहजिकच मीराने येताक्षणीच बेडरूम एरियाचा ताबा घेतला. ती प्रत्येकाला स्वत:चं साहित्य जागेवर ठेवण्याचा आदेश देत  सुटली. अशातच जयचा टॉवेल त्याच्या बेडवर पडलेला  मीराला दिसला. मग काय मीराने तडक जयला फर्मान सोडले आणि बेडवरचा ओला टॉवेल उचलून ठेवण्याचा आदेश दिला.

जयने अंघोळीला जाताना घेतलेला टॉवेल बेडवर ठेवला. त्याला काम सांगण्यात आल्याने त्याचा टॉवेल बेडवर राहिला. मीराने जयकडे टॉवेल जागेवर ठेवण्याची मागणी केली. त्यावर जयने तो टॉवेल ओला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र मीराने हट्टाने तो टॉवेल जयला पुन्हा पलंगात ठेवायला लावला. जयने नापसंतीने का होईना टॉवेल तर उचलला. पण हे करताना जयने हातवा-याने आपल्याला बिनडोक म्हटल्याचा दावा करत, मीराने अख्ख घर डोक्यावर घेतलं. मग काय दोघांमध्येही जुंपली. घरातील इतर सदस्यांनि मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐकणार कोण?  मी अजून आंघोळच केली नाहीय तर टॉवेल ओला कसा असेल आणि अंघोळ करायच्या आधी मी तो टॉवेल बाथरूम एरियात का टाकून देऊ? असा त्याचा प्रश्न होता. तर जयने आपल्याला बिनडोक म्हटलं हा मीराचा आरोप होता. हा वाद आणखी चिघळण्याआधी सदस्यांनी कसाबसा वाद  निकाली काढला. पण हो, पहिल्याच दिवशी इतका मोठा धमका पाहून, पुढचे 100 दिवस कसे असतील, याचा अंदाज प्रत्येकाला आला.  

टॅग्स :बिग बॉस मराठी