Join us

Bigg Boss Marathi 3: आज उघडले जाणार 'बिग बॉस'च्या घराचे मुख्य प्रवेशद्वार, कोण होणार नॉमिनेट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:59 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? आणि कोण होणार सुरक्षित हे आज कळेलच. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले की, बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल. आता पार पडणार आहे घराबाहेर होण्याची प्रक्रिया.. यानंतर नवे आलेले सदस्य नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे सांगत आणि त्यांच्या नावाच्या बाहुल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर टाकताना दिसत आहेत. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य हे सदस्य सहभागी झाले आहेत. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले. विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.

स्नेहा वाघने जयला सुनावलं

स्नेहा वाघने जयला ऐकवले. तिच्या बोलण्याने कुठेतरी जय दुखावला गेला आहे. त्याने तसे न बोलता कृतीतून दाखवले. स्नेहाच्या वक्तव्यानंतर त्याला अश्रु अनावर झाले. आणि याच संदर्भात कदाचित मीरा, उत्कर्ष जयशी बोलताना आणि त्याची समजूत काढताना दिसणार आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठी