बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत टॉप ८ सदस्य. काल संतोष चौधरी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस यांना घराबाहेर पडावे लागले. आता या नव्या आठवड्यात कोण घराचा नवा कॅप्टन बनणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये येणार ? आणि कोण सेफ होणार ? याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहली आहे. आज घरामध्ये रंगणार आहे नॉकआउट हे नॉमिनेशन कार्य ! बघूया कोण कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकणार ? कोणता सदस्य कोणाच्या बाजूने खेळणार? नॉकआउट या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्य ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करू इच्छितात त्या स्पर्धकाच्या नावाचे पुस्तक पटकावायचे आहे. कोण होणार नॉमिनेट हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसचा आजचा एपिसोड पाहावा लागणार आहे.
घरामधून दादूस म्हणजेच संतोष चौधरी बाहेर !बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या... आणि जे त्यांचा घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले. तर घरामध्ये खास पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगले काही आगळेवेगळे टास्क. तर नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये दादूस, मीरा, मीनल, विकास आणि सोनाली नॉमिनेट झाले. ज्यामध्ये दोन सदस्यांना सलमान खानने सेफ केले विकास आणि मीनल आज मीरा आणि दादूस डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरले आहेत टॉप ८ सदस्य.