Join us

Bigg Boss Marathi 3: 'त्याची सत्ता आणण्यासाठी तो विशालचा वापर करतोय', उत्कर्षच्या मते कोण घेतंय विशालचा फायदा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 20:22 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये उत्कर्ष, जय, गायत्री, मीरा विकासला काही तरी सांगू इच्छित आहेत.

बिग बॉस मराठी ३ आता मनोरंजक वळणावर आले आहे. सीझनला सुरूवात होऊन काही दिवस उलटले नाहीत आणि घरात वाद पहायला मिळाले. घरात काही दिवसांतच तीन ग्रुप पहायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) आजच्या भागामध्ये उत्कर्ष, जय, गायत्री, मीरा विकासला काही तरी सांगू इच्छित आहेत. नक्की कोणाबद्दल बोलण सुरू आहे ? कोणापासून विशालला सावध रहायला पाहिजे असे उत्कर्ष सांगत असेल ? आजच्या भागामध्ये कळेलच.

 विकास आज उत्कर्षकडे मत मागयला जाणार आहे. त्यावर उत्कर्षचं सांगण आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्ही सगळे उभे राहू तुझ्या बाजूने, पण इकडची जबाबदारी कोण घेणार ? मी कसं म्हणतो आहे आम्ही सगळे तुझ्या बाजूने उभे रहातील. तू दिसलास ना त्याची कमी होऊन जाईल. तो जो हवेमध्ये गेला आहे ना... आम्हांल तू आलास तर चालेल. आम्हांला वाटतं आहे तू यावं. पण इथे मग रिकाम ठेवा ना. तू बाकीच सांभाळशील मग मीरा करेल.'

'तो' त्याची सत्ता आणण्यासाठी करतोय विशालचा वापर

तो पुढे म्हणाला की,  'विशालचा फक्त चेहरा आहे आणि मागे तो आहे. तो त्याची सत्ता आणण्यासाठी विशालचा वापर करतो आहे. विशाल भोळा आहे, तो विशालचा वापर करतो आहे. विशाल वाटतं आहे मी कॅप्टन होतो आहे ना बसं मग. त्याला हे कळत नाहीये तो त्याचा वापर करून त्याला फेकून देणार, मग काय फायदा ? आज विशाल आहे उद्या तो कोणाचा पण वापर करेल फायदा काय... ते पण आल्या आल्या.' विकास याच्यावर काय उत्तर देतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी