Join us  

bigg boss marathi 3: उत्कर्ष शिंदेचा संपणार प्रवास; 20 लाख रुपये घेऊन पडणार शोमधून बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 4:54 PM

bigg boss marathi 3: महेश मांजरेकर टॉप ५ फायनलिस्टला एक ऑफर देणार आहेत. विशेष म्हणजे ही ऑफर ऐकल्यावर उत्कर्ष शिंदे हात वर करणार आहे. त्यामुळे तो ही ऑफर स्वीकारुन बिग बॉसचा शो सोडतो का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सध्या एकाच गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या(bigg boss marathi) तिसऱ्या पर्वाची. आज बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगणार असून 'बिग बॉस'ला त्यांचा विजेता मिळणार आहे. त्यामुळे यंदाचं पर्व कोण गाजवणार? आणि, कोण ही ट्रॉफी घेऊन जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच सध्या घरात शेवटे ५ स्पर्धक राहिले आहे. आणि, या प्रत्येकामध्ये चुरशीचा सामना आहे. विशेष म्हणजे आज या घरातील शेवटचं elimination राऊंड रंगणार आहे. इतकंच नाही तर या राऊंडमध्ये उत्कर्ष शिंदे (utkarsh shinde) बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी ३ च्या शेवटच्या elimination राऊंडचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर आणि बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे दिसून येत आहेत. यावेळी महेश मांजरेकर पाचही स्पर्धकांना पाच लाख रुपयांची ऑफर देतात. यात पाच लाख रुपये घेऊन एका स्पर्धकाला बाहेर पडायचं आहे. यात उत्कर्ष त्याचा हात वर करताना दिसतो.

दरम्यान, महेश मांजरेकरांनी ५ लाखांची ऑफर दिल्यानंतर कोणताही स्पर्धक घरातून बाहेर पडायला तयार होत नाही. त्यामुळे मांजरेकर स्पर्धकांसमोर २० लाखांची ऑफर ठेवतात. ही ऑफर ऐकल्यावर उत्कर्ष शिंदे हात वर करतो. आता उत्कर्षने हात वर केल्यानंतर तो ही ऑफर स्वीकारतोय का? की त्याचं एखादं मत मांडतोय हे प्रेक्षकांना आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेमध्येच कळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार