Join us

Bigg Boss Marathi 3 : टास्कवरुन सदस्यांमध्ये रंगली चर्चा, शेवटचा कॅप्टन बनण्याचा मान कोणाला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:27 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे शेवटचे कॅप्टन्सी कार्य.

आज बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये रंगणार आहे शेवटचे कॅप्टन्सी कार्य. यावरूनच घरामध्ये सोनाली, उत्कर्ष, विशाल तर दुसरीकडे आदिश आणि मीनलमध्ये चर्चा रंगली आहे. आजच्या टास्कमध्ये कोण जिंकणार ? कोणत्या सदस्याला घराचा शेवटचा कॅप्टन बनण्याचा मान मिळवणार हे आज कळेलच. सोनालीचे म्हणणे आहे, स्नेहा खूपच अडून राहिली. उत्कर्षचे त्यावर म्हणणे आहे कारण काय आहेना आता दोन-तीन दिवसात एलिमनेशन आहे कोणना कोण व्यक्ती निघेल सगळ्यांना खेळण्याची संधी मिळायला हवी. सोनालीचे म्हणणे आहे, संचालकाला कळले पाहिजे शेवटचा आहे सगळ्यांचा खेळ दिसू दे. दुसरीकडे आदिश मीनलला सांगताना दिसणार आहे, मी काही मित्र म्हणून संचालन नाही करणार. मीनल म्हणाली, जर तो निर्णय होता मी ओके होते. येऊ दे दुसरी संधी द्या... पण मला तुम्ही कॉर्नर नका करू मुद्दाम... सगळे मिळून मुद्दाम करत होते. 

प्रत्येक गेममध्ये नियम तोडलेत - उत्कर्षउत्कर्षचे म्हणणे आहे, बिग बॉसच्या घरात आपण कितीतरी, प्रत्येक गेममध्ये रूल ब्रेक केले आहेत. प्रत्येक गेममध्ये. विशाल तू मला सांग जेव्हा तू, मी, जय खेळतो किंवा आपण सगळे ताकदवाले एकत्र खेळतो त्यावेळेस बिग बॉस यांनी कधी घराबाहेर काढले आहे का आपल्याला ? खेळामध्ये तुम्ही खेळा… रद्द केला तरी खेळा परत खेळा... खेळू द्या. खेळायलाच नाही मिळालं तर आपण हरतो तिथेच तो गेम. आता ही चर्चा नक्की कशावरून सुरू आहे? कोणाबद्दल बोलत आहेत आदिश आणि मीनल हे आजच्या भागामध्ये कळेलच.

टॅग्स :बिग बॉस मराठी