Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरातून दिंगबर नाईक यांची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 10:12 IST

घरामध्ये बिग बॉस मराठी सिझन २ मधील पहिली वाईल्ड कार्ड झाली आणि ती म्हणजे हीना पांचाळ. आजच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. घरामध्ये बिग बॉस मराठी सिझन २ मधील पहिली वाईल्ड कार्ड झाली आणि ती म्हणजे हीना पांचाळ. हीनाच्या घरात जाण्याने आता काय घडेल ? ती कोणत्या ग्रुप मध्ये जाईल हे लवकरच कळेल. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून मागील आठवड्यामध्ये मैथ्थिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग काल सेफ झाला. नेहा शितोळे, विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके नॉमिनेशन होते ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये दिंगबर नाईक यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.  

आजच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला. तर शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये झालेल्या वादावरून देखील चर्चा झाली, आणि प्रत्येकाने आपली मत मांडली. या टास्कवरून नेहाला भाषेवरून महेश मांजरेकर यांनी सांगितले प्रत्येक विभागातील भाषेचा मान ठेवूया. अभिजीत केळकर याने देखील सांगितले नेहा चुकीचा गेम खेळत होती फक्त शिव नव्हे तर प्रत्येक टास्कला तिने त्रास दिला... शिवने उत्तम उपाय काढला होता असे देखील तो म्हणाला. नेहाने देखील तिची बाजू मांडली. तर सुरेखा, पराग, वैशाली, दिगंबर यांचे तास छान झाले असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. तर विश्वचषक सामन्याबद्दल देखील चर्चा झाली. तर सुरेखा पुणेकर यांनी कडक शब्दांत बिचुकले यांना खडसावले... घरातील सदस्य इतके खुश झाले कि, त्यांनी गाणे म्हंटले “ही सुरेखा आम्हांला पटलेली आहे”...  तर महेश मांजरेकर म्हणाले तुम्ही बरोबर शाळा घेतली.

 तर घरामध्ये नुकतीच एन्ट्री झालेल्या हीनावर जबाबदारी सोपावली, घरातील सदस्याला विशेषणांचा क्रॉन घालायच. हिनाने तापट – बिचुकले, कन्फ्युज माधव, बोलबच्चन नेहा, फटकळ विणा आणि डोकेबाज पराग अशाप्रकारे त्यांच्या घरातील वागणुकीनुसार क्रॉन दिले.

  बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीदिगंबर नाईक