Join us  

पराग कान्हेरेची कथा वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी... या व्यक्तीला दिलीय त्याने त्याची किडनी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:43 PM

परागने सांगितलेली गोष्ट ऐकून किशोरी शहाणे यांना देखील धक्का बसला.

ठळक मुद्देमी जेव्हा त्याला आयसीयुमध्ये त्याला बघायला गेलो तेव्हा त्याची ती अवस्था पाहून मीच माझ्या मावस भावाला सांगितले की, माझे नाव किडनी डॉनरमध्ये लिही. माझी किडनी मॅच झाली. त्यामुळे मी माझी किडनी त्याला डोनेट केली.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या घरातील स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. 

बिग बॉस मराठी २ मधील स्‍पर्धक एकमेकांसोबतच नव्हे तर कॅमेऱ्यासमोर देखील प्रांजळपणे त्‍यांच्‍या कथा शेअर करत आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये पराग कान्हेरे त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेविषयी बोलताना दिसत आहे. किशोरी शहाणे यांना परागने सांगितलेली त्याच्या आयुष्यातील एक घटना ऐकून त्यांना प्रचंड धक्का बसला.

पराग आणि किशोरी लिव्हिंग एरियामध्ये आराम करत बसलेले असताना परागने किशोरी यांना सांगितले की, माझ्या भाच्याला लहानपणापासूनच किडनीमध्ये काहीतरी प्रोब्लेम होता. त्याला मेडिकल टर्ममध्ये काय म्हटले जाते हे मला माहीत नाही. पण त्या आजारामुळे त्याची एक किडनी फेल झाली होती आणि केवळ एकच किडनी काम करत होती. परागचे हे ऐकल्यानंतर किशोरी यांनी परागला त्याच्या भाच्याचे वय किती आहे हे विचारले. त्यावर त्याने सांगितले की, आता तो १२ वर्षांचा आहे. तो अगदी लहान असल्यापासूनच त्याची ट्रीटमेंट सुरू होती. तो दिसायला अतिशय स्मार्ट असल्याने त्याने आमच्या एका प्रोजेक्टसाठी मॉडलिंगदेखील केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे आजारपण वाढत गेल्याने त्याला अंथरुणावरून हलता देखील येत नव्हते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती अतिशय गंभीर होत होती. 

परागने त्याच्या भाच्याच्या तब्येतीविषयी पुढे सांगितले की, मी जेव्हा त्याला आयसीयुमध्ये त्याला बघायला गेलो तेव्हा त्याची ती अवस्था पाहून मीच माझ्या मावस भावाला सांगितले की, माझे नाव किडनी डॉनरमध्ये लिही... त्यानंतर डॉनर लीस्टमधील सगळ्यांचे रक्तगट तसेच किडनी मॅच होतेय का हे रुग्णालयाकडून तपासण्यात आले तर त्यावर माझी किडनी मॅच झाली. त्यामुळे मी माझी किडनी त्याला डोनेट केली.

टॅग्स :बिग बॉस मराठीपराग कान्हेरे