Join us

​बिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 15:28 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहिवाशी संघाला मागील दिवशी दिलेल्या कार्याचे पडसाद आज दिसून येणार आहेत. बिग बॉसने ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहिवाशी संघाला मागील दिवशी दिलेल्या कार्याचे पडसाद आज दिसून येणार आहेत. बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची संघर्षगाथा घरच्यांना आणि स्पर्धकांना सांगण्याची संधी दिली. या टास्क मध्ये एकएक करून प्रत्येक स्पर्धकाने त्यांची संघर्षगाथा सांगण्यास सुरुवात केली. हे सांगत असताना घरातील सगळे भावूक झाले. बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारे अनिल थत्ते यांची वेळ येत येताच त्यांनी आपली संघर्षगाथा न सांगता जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली.  या टास्क मध्ये अनिल थत्ते यांनी बराच वेळ घेऊन अनावश्यक गोष्टी देखील स्पर्धकांना सांगितल्या. या कारणामुळे आस्ताद काळे अनिल थत्ते यांच्यावर चिडला आणि त्यांना खडसावून सांगितले कि, इतका वेळ आपल्याकडे नसून त्यांनी लवकारात लवकर एक महत्वाचा क्षण सांगून आपले बोलणे संपवावे. अनिल थत्ते यांच्या अश्या वागण्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना त्यांची संघर्षगाथा सांगायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याच मुद्द्यावरून मेघा आणि आरती या दोघांनीही आपली नाराजगी अनिल थत्तेकडे स्पष्टपणे व्यक्त केली. मेघा आणि आरतीने त्यांना न पटलेली ही गोष्ट अनिल थत्ते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या अशा वागण्यामुळे आरतीला पुरेसे बोलता न आल्याची खंत देखील आरतीने अनिल थत्ते यांना बोलून दाखविली.