त्याचे झाले असे की, बिग बॉसच्या सीजन ९ मध्ये किश्वर मर्चंटने वाइल्ड कार्ड एंट्री करणाºया ऋषभ सिन्हाला पाणी देताना त्याच्या ग्लासात थुंकली होती. वास्तविक तिच्या या कृत्याचा नंतर तिला पश्चात्तापही झाला होता. तिने याबाबतची सर्वांसमोर जाहीर माफीही मागितली होती. परंतु तिचा हा किस्सा आता नव्याने चर्चिला जात असल्याने ती भलतीच संतापली आहे. किश्वरने हिनाचा हा व्हिडीओ शेअर करताना त्याखाली लांबलचक तिची प्रतिक्रिया लिहिली. किश्वरने लिहिले की, ‘काही क्षण असे असतात की आपल्या हातून कळत नकळत चुका होत असतात. जेव्हा त्याचा पश्चात्ताप होतो तेव्हा आपण केलेली चूक सुधारताना माफी मागून आयुष्य पुढे नेतो. मी अतिशय सन्मानाने सांगू इच्छिते की, ‘हिना खान तुला घरात फक्त दोन दिवस झाले आहेत. तू इतर विषयांवर चर्चा करू शकते. परंतु जेव्हा टास्क सुरू होतील, तेव्हा किती चांगली आहेस आम्हाला कळेलच. कारण आम्ही तुला बाहेर बसून बघत आहोत. शिवाय तू केलेले कांड मी चांगलेच ऐकूण आहे. ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेदरम्यान तुझे बरेचसे किस्से माझ्या कानावर आले आहेत. तसेच ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवरही तू काय केलेस हे मला माहिती आहे.
किश्वरने पुढे लिहिले की, ‘याठिकाणी मी माझ्या वतीने स्वत:ची वकिली करीत नाही, कारण तो माझा पास्ट होता. मी ऋषभला याकरिता माफीही मागितली. सध्या आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. मी एक विजेता म्हणून घराबाहेर पडली असून, तेच माझ्याकरिता महत्त्वाचे आहे. हिना, आॅल द बेस्ट... मी तुला बघत आहे.’ अशा शब्दात किश्वरने राग व्यक्त केला. मात्र काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीटही केली. सध्या किश्वर ‘ब्रह्मराक्षस’ मालिकेत काम करीत आहे.