Join us  

Bigg Boss Marathi 2ः शिवानी सुर्वे सांगतेय तिचा प्रियकर अजिंक्य ननावरेबाबत खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:53 PM

वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये ती किशोरी शहाणे यांना तिच्‍या प्रियकराबाबत खास गोष्टी सांगताना दिसत आहे. 

ठळक मुद्देशिवानी अजिंक्यची नेहमीच टर खेचते, त्याला खूप सतवते. याविषयी शिवानी सांगते, ''एकदा मी त्‍याचे आयब्रोज केले होते. एकदा तर तो झोपला होता तर मी वॅक्सिंगची क्रीम त्याच्या शरीराला लावून ठेवले होते. अखेर त्याला वॅक्सिंग करायला लागले होते.'' 

'बिग बॉस मराठी २'ची स्‍पर्धक शिवानी सुर्वे आपल्‍या बिनधास्‍त स्‍वभावाबद्दल आणि मनमोकळ्या वागण्‍याबद्दल ओळखली जाते.  बिग बॉस घरामध्‍ये तिच्‍या पुनरागमनाने निश्चितच उत्‍साह वाढला आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये ती किशोरी शहाणे यांना तिच्‍या प्रियकराबाबत खास गोष्टी सांगताना दिसत आहे. 

शिवानी सांगते, ''आय वील टेल यू अजिंक्‍य माझ्या प्रेमात कसा पडला... फॉर द फर्स्‍ट टाइम! मी ना शूटिंगमध्‍ये होती, ती सिरीयल संपायला आली होती आणि मी माझ्या एका फ्रेंडला भेटायला चालले होते. सो अजिंक्‍य मला बोलला, अरे तू जातेयस ना तर माझ्यासाठी एक ब्‍लॅक कॉफी आण... मी म्‍हणाले ओके फाइन आणते मी. तर मी माझ्या फ्रेंडला भेटले, आम्‍ही गप्‍पा मारल्‍या आणि मी एक कॉफी घेतली त्‍याच्‍यासाठी. पण ती कॉफी अजिंक्यसाठी घेतली आहे याचा मला थोड्याच वेळात विसर पडला आणि त्यातील अर्धी कॉफी तरी मी पिऊन टाकली.'' 

शिवानी पुढे सांगते, ''थोड्याच वेळात मला माझी चूक माझ्या लक्षात आली. मग मी सेटवर गेल्यावर स्‍पॉट दादांकडे गेले आणि त्‍यांच्‍याकडून कॉफी घेतली आणि त्‍या कॉफीमध्‍ये मिक्‍स केली आणि त्‍याला जाऊन बोलले, बघ गरम गरम कॉफी आणली आहे मी तुझ्यासाठी... सेटवर आल्यावर कॉफी परत गरम करायला देखील सांगितली. त्याने या कॉफीसाठी माझे आभार देखील मागितले. पण त्‍याला काय माहीत मी कॉफी अर्धी पिऊन ठेवली होती. त्‍याला वाटलं ती स्‍टारबक्‍सची कॉफी आणळी आहे... पण ती होती एक रूपयाच्या पाऊचची.''

हे ऐकून किशोरी शहाणे मोठमोठ्याने हसायला लागल्या. शिवानी अजिंक्यची नेहमीच टर खेचते, त्याला खूप सतवते. याविषयी शिवानी सांगते, ''एकदा मी त्‍याचे आयब्रोज केले होते. एकदा तर तो झोपला होता तर मी वॅक्सिंगची क्रीम त्याच्या शरीराला लावून ठेवले होते. अखेर त्याला वॅक्सिंग करायला लागले होते.'' 

अजिंक्य ननावरे हा देखील अभिनेता असून त्याने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सख्या रे, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वेकिशोरी शहाणे