बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा पाचवा दिवस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 13:16 IST
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहिवाशी संघाला मागील दिवशी दिलेल्या कार्याचे पडसाद आज दिसून येणार आहेत. मेघा आणि ...
बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा पाचवा दिवस !
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहिवाशी संघाला मागील दिवशी दिलेल्या कार्याचे पडसाद आज दिसून येणार आहेत. मेघा आणि आरती या दोघांनीही आपली नाराजगी अनिल थत्तेकडे स्पष्टपणे व्यक्त करणार आहेत. बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांचा जीवनप्रवास घरच्यांना आणि स्पर्धकांना सांगण्याची संधी दिली. पण, या कार्यामध्ये अनिल थत्ते यांनी बराच वेळ घेऊन अनावश्यक गोष्टी देखील स्पर्धकांना सांगितल्या त्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट अनिल थत्ते यांच्या निदर्शनास आज आणून देणार आहेत. याचदरम्यान जुई गडकरीने विनीत भोंडेला तिला न पटणाऱ्या गोष्टी विचारून ती त्याला जाब विचारताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक एकमेकांना ओळखत नसल्याने काही खटके उडणे, मतभेद होणे नक्कीच स्वाभाविक आहे पण आता या घरामध्ये ग्रुप बनण्यास सुरुवात झालेली आहे हे मात्र नक्की.अनिल थत्ते आणि विनीत भोंडे हे दोघेही बिग बॉस घरामध्ये चर्चेचा विषय बनले असून, घरातील बरेचसे सदस्यांना त्यांचे वागणे पटत नसल्याचे प्रेक्षकांना दिसून येत आहे. एकीकडे उषाजी विनीतला वारंवार सांगत असतात कि त्याने आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर सयंम ठेवण्याची गरज आहे तर दुसरीकडे अनिल थत्ते यांना सतत प्रकाश झोतामध्ये रहायला आवडते याबद्दलची चर्चा मुलींच्या रूमध्ये रंगत असलेली प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हे घडत असताना विनीत भोंडेला बिग बॉसने कन्फेशन रूमध्ये बोलविण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस त्याला एक सिक्रेट टास्क देण्यात येणार आहे. आता हा टास्क काय आहे ? कश्याच्या संदर्भात आहे ? विनीत हा टास्क पूर्ण करू शकेल का ? हे बघणे रंजक असणार आहे ... आस्ताद, रेशम, राजेश, सुशांत यामध्ये काहीतरी शिजत असल्याचे दिसणार आहे. ते नक्की काय प्रेक्षकांना भाग बघितल्यावरच कळेल... दरम्यान बिग बॉसने घरामधील कॅप्टनशिपचे महत्त्व घरच्यांना समजावले आणि आता घराचा दुसरा कॅप्टन निवडण्याची घोषणा केली. आणि नंतर स्पर्धकांमध्ये याबद्दलची चर्चा रंगली.