Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९' च्या अंतिम टप्प्यात 'या' स्पर्धकानं मारली बाजी, सर्वाधिक मतं मिळवत बनला नंबर वन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 09:41 IST

२४ ऑगस्ट रोजी प्रीमियर झालेल्या या शोमध्ये आता फक्त ९ स्पर्धक ट्रॉफीसाठी लढत आहेत.

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो 'बिग बॉस सीझन १९' आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २४ ऑगस्ट रोजी प्रीमियर झालेल्या या शोमध्ये आता फक्त ९ स्पर्धक ट्रॉफीसाठी लढत आहेत.  चाहते जिओ हॉटस्टारवर आपल्या लाडक्या स्पर्धकासाठी वोटिंग करत आहेत. अशातच मीडियावर व्हायरल झालेल्या मतदान याद्यांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याच दिसलंय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अंतिम फेरीपासून केवळ दोन आठवड्यांपूर्वी सर्वाधिक मतं मिळवून एक स्पर्धक सध्या सगळ्यांना मागे टाकत 'नंबर वन'वर पोहोचला आहे.

'बिग बॉस १९' च्या व्होट पेजनुसार, सध्या सर्वाधिक मते मिळवणारा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे आहे. प्रणित मोरेला २३,३९२ मते मिळाली आहेत, म्हणजेच तब्बल ३०% मते घेऊन तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. गौरव खन्ना २०,४४४ मते म्हणजेच २६% मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत फरहाना भट तिसऱ्या क्रमांकावर, तर अशनूर चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून स्पष्ट होतं की, गौरव खन्ना, फरहाना किंवा अशनूर यांच्यापेक्षा महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 

प्रणित  सुरुवातीला बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. पण, आता मात्र तो चांगला खेळत आहे. त्यामुळेच त्याला चाहते आणि सेलिब्रिटींचाही फूल सपोर्ट मिळत आहे. प्रणितला अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सचा पाठिंबाही मिळत आहे. आता प्रणित टॉप ५ मध्ये जागा मिळवू शकेल का, हे पाहावं लागेल. आता घरात प्रणितसह गौरव खन्ना, फरहाना, अश्नूर कौर, अमाल मलिक, कुनिका सदानंद, शहबाज, मालती चहर, तान्या मित्तल हे सदस्य आहेत. यापैकी आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहणं रंजनकारक असणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pranit More Leads 'Bigg Boss 19' Finale Voting Race

Web Summary : As 'Bigg Boss 19' nears its finale, Pranit More leads in viewer votes. He secured 30% of votes, surpassing other contestants like Gaurav Khanna. The competition intensifies between the remaining nine contestants for the winning trophy.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजन