Bigg Boss 19 Ticket To Finale: 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले जवळ आला असून स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक सदस्य महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टास्कमध्ये १०० टक्के देत आहे. 'बिग बॉस १९' हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. कधी या घरातील स्पर्धकांच्या वादाने तर कधी टास्कमधील ट्विस्टने. नुकताच घरात 'तिकीट टू फिनाले' (Ticket To Finale) हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये अनेक स्पर्धकांनी जीव ओतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केला आणि अखेर चार स्पर्धकांनी विजय मिळवून थेट 'तिकीट टू फिनाले' निश्चित केलं.
'बिग बॉस १९' मधील 'तिकीट टू फिनाले' टास्कपूर्वी सर्व घरातील सदस्यांना असेंब्ली रूममध्ये बोलावण्यात आलं. वाइल्डकार्ड स्पर्धक मालती चहर आणि शाहबाज यांना 'तिकीट टू फिनाले' टास्क खेळण्याची संधी द्यावी का, याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. त्यानंतर उर्वरित सदस्यांना टास्कची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
'फिल्म विंडो'च्या माहितीनुसार, पहिल्या राउंडमध्ये अशनूर कौर पहिली स्पर्धक ठरली, जिने 'तिकीट टू फिनाले'ची दावेदारी मिळवली. तिचा सामना तान्या मित्तलशी झाला. या टास्कदरम्यान गौरवने अशनूरला मदत केली. तर तान्याला प्रणितचा सपोर्ट मिळाला. मात्र शेवटी प्रणितने चिटिंग केल्याचा समोर आलं. प्रणित मोरे आणि शहबाज यांच्यात दुसरा सामना झाला. प्रणितला गौरवनं तर शहबाजला अशनूरनं साथ दिली. यामध्ये प्रणित जिंकला आणि तर शहबाज हरला.
तिसरा सामना गौरव खन्ना आणि मालती चाहर यांच्यात झाला. अशनूरनं गौरवला आणि शहबाजनं मालतीला मदत केली. यामध्ये गौरवनं मालतीला हरवत दावेदारी मिळवली. तर चौथा सामना फरहाना आणि अमाल मलिक यांच्यात झाला. अमालला शहबाजनं सपोर्ट केलं, तर गौरव फरहानाच्या मदतीला धावून आला. यामध्ये फरहाना जिंकली. अर्थात अमाल, तान्या, मालती आणि शहबाज यांना 'तिकीट टू फिनाले' मिळालं नाही. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या शोचा ग्रँड फिनाले येत्या ७ डिसेंबरला होणार असल्याचं बोललं जात आहे.
Web Summary : In 'Bigg Boss 19', Ashnoor, Gaurav, Farhana win 'Ticket to Finale' round. Tanya, Amal, Malati, and Shahbaz are eliminated after fierce competition and strategic alliances.
Web Summary : 'बिग बॉस 19' में अशनूर, गौरव, फरहाना ने 'टिकट टू फिनाले' जीता। तान्या, अमाल, मालती और शाहबाज कड़ी प्रतिस्पर्धा और रणनीतिक गठजोड़ के बाद बाहर हो गए।