Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:56 IST

'बिग बॉस १९' हे पर्व सुरू होण्यास आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. तर काही कन्फर्म स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये महाभारतमधील कुंती एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. 

Bigg Boss 19 : 'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय रिएलिटी शो आहे. नेहमी भांडण तंटे आणि वादविवादाने चर्चेत राहणारा हा शो चाहते आवर्जुन बघतात. 'बिग बॉस १९' हे पर्व सुरू होण्यास आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. तर काही कन्फर्म स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये महाभारतमधील कुंती एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. 

'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत कुंतीची भूमिका साकारून अभिनेत्री शफक नाज हिने प्रसिद्धी मिळवली. याआधी शफकने बिदाई, अदालत, क्राइम पेट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र अभिनेत्रीला महाभारत या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. आता शफक नाज 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जातंय. 'बिग बॉस १९'चे अपडेट्स देणाऱ्या 'बिग बॉस तक' या चॅनेलवरुन अभिनेत्रीचं नाव कन्फर्म करण्यात आलं आहे. 

शफक नाजचा भाऊ शीजान जेलमध्ये होता. त्यामुळे लोक तिला "हत्यारे की बहन" म्हणून हिणवायचे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याचा खुलासा केला होता. लोक शिव्याही द्यायचे. हे एका भयानक स्वप्नाप्रमाणे असल्याचं शफक म्हणाली होती. दरम्यान, आता ती 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार