Bigg Boss 19: अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते नवे चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद यंदाच्या बिग बॉसची स्पर्धक आहे.
एकेकाळी बॉलिवूड गाजवलेली कुनिका सदानंद आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. करिअरच्या शिखरावर असतानाच तिने बॉलिवूडला रामराम केला होता. त्यानंतर तिने वकिलीचं शिक्षण घेतल्याचं बिग बॉसच्या मंचावर सांगितलं. बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली कुनिका बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार हे पाहावं लागेल.
कुनिकाने ८०-९०चं दशक गाजवलं होतं. अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. गुमराह, बंद दरवाजा, हॉट मनी, बेटा, फरेब, अमावस की रात, हम साथ साथ है अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तर संगिनी, डॉलर बहु, अकबर बिरबल, प्यार का दर्द है, किटी पार्टी अशा मालिकांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली.