Bigg Boss 19: अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते नवे चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. यापैकी काही नावांवर शिक्कामोर्तबही करण्यात आलं होतं. यापैकीच एक नाव होतं ते म्हणजे बॉलिवूडचा गायक अमाल मलिक. अखेर अमालने आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
'बिग बॉस १९'च्या प्रोमोमध्ये अमालची झलक दिसली होती. या प्रोमोवरुन चाहत्यांनी अमाल मलिक असल्याचं ओळखलं होतं. प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंगर अमाल मलिकने बिग बॉसमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. पण, जेव्हा सलमानला समजलं की अमाल मलिक बिग बॉसमध्ये येणार आहे. तेव्हा त्याचा यावर विश्वासच बसला नाही. अमाल बिग बॉसच्या घरात जाणार असल्याने सलमानला भीतीही वाटत आहे. कारण, अमाल रागीट स्वभावाचा असल्याचं सलमानने सांगितलं. पण त्याची हीच प्रतिमा बिग बॉसच्या घरात बदलणार असल्याचं अमालने म्हटलं आहे. आता तो प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करेल हे पाहाणं रंजक ठरणार आहे.
अमाल मलिक हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध सिंगर अरमान मलिकचा भाऊ आणि अनु मलिकचा भाचा आहे. भाऊ आणि काकाप्रमाणे अमालला स्टारडम मिळवता आलं नाही. पण, त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमधली गाणी गायली आहेत. चले आना, ओ खुदा, लडकी ब्युटिफूल कर गयी छूल, बेसब्रिया ही त्याची गाणी हिट ठरली आहेत.