Join us

रील ते रिअल लाइफ कपल, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट 'बिग बॉस १७'च्या घरातील सदस्यांवर पडणार भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 21:55 IST

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी एन्ट्री घेतली आहे. 

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'ची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर पार पडला. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी एन्ट्री घेतली आहे. 

'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वाची सिंगल विरुद्ध कपल अशी थीम असणार आहे. या शोमध्ये कोण कोण सहभागी होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. नुकताच या शोचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या शोमध्ये टीव्ही माध्यमातील लोकप्रिय जोडपं नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने एन्ट्री घेतली आहे. छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांना भुरळ घालणारे ऐश्वर्या आणि नील आता 'बिग बॉस १७'मधून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहेत. 

दरम्यान, ऐश्वर्या आणि नील यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी फुलली. त्यांनी २०२१मध्ये त्यांनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. ऐश्वर्या 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकार