Join us  

लाकडी फर्निचर अन् डिझायनर वस्तू; Bigg Boss 17च्या घराची झलक पाहिलीत का? Inside video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 11:05 AM

Bigg boss17 house: हे घर ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी डिझाइन केलं आहे.

बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता बिग बॉसचं १७ (Bigg boss 17) वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या पर्वाचा ग्रँड प्रिमियर सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वीच या घराची एक झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे. कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस १७च्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे यावेळी घरातील इंटेरिअर प्रचंड खास असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस १७ च्या घरातील inside व्हिडीओ व्हायरल होत आहे. यंदा बिग बॉसचं घर कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी डिझाइन केलं आहे. विशेष म्हणजे यंदाचं घर इतर पर्वांपेक्षा अत्यंत वेगळं असून यात फॅन्टसीलँडप्रमाणे प्रत्येक गोष्ट डिझाइन केली आहे.

नेमकं कसं आहे बिग बॉस १७ चं घर?

या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी एक छान गार्डन तयार करण्यात आलं आहे. सोबतच निवांत वेळ घालवण्यासाठी सिटींग अरेंजमेंटही करण्यात आली आहे. सोबतच स्विमिंग पूलाच्या वर एक मोठा डोळा बसवण्यात आला आहे. तसंच गार्डन एरिया ते लिव्हिंग रुम पर्यंतच्या मार्गात एक सुंदर पेगाससची मुर्ती बसवण्यात आली असून त्याला प्रवेशद्वारासारखा आकार देण्यात आला आहे.

या घरात जास्तीत जास्त लाकडी सामानाचा वापर करण्यात आला आहे. किचनमध्ये टेबल, बार स्टूल,किचन कॅबिनेट, विंटेज कटलरी यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी यंदाची थीम आहे. त्यामुळे यात पाश्चात्य पद्धतीच्या काही डिझाइन्सदेखील पाहायला मिळतात. घरात पिंक, लाइलेक आणि पांढऱ्या रंगाच्या पेस्टल शेड्सचा जास्त वापर करण्यात आला आहे. या घरामध्ये सुंदर डिझाइन केलेलं बाथरुम, मेडिटेशन झोन, थेरपी रूम, आलिशान सोफे, अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसलमान खान