Join us  

Bigg Boss 16 : हे देखील देशाला बघू दे..., साजिद खानवर शर्लिन चोप्राचा पुन्हा एकदा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:22 PM

Bigg Boss 16, Sajid Khan : साजिद बिग बॉसच्या घरात दाखल होताच त्याच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

बिग बॉस 16’  (Bigg Boss 16) हा शो सध्या जाम चर्चेत आहे. आठवडाभरातच शो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. पण एका गोष्टीवरून सोशल मीडियावर ‘हंगामा’ सुरू आहे. होय, ‘बिग बॉस 16’मध्ये बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला  ( Sajid Khan  ) पाहून अनेकांनी नाराजी व संताप व्यक्त केली आहे. गेल्या दोन तीन वर्षांत साजिद खानवर ‘मीटू’अंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे अनेक आरोप झालेत. अनेक अभिनेत्री व मॉडेल्सनी त्याच्याविरोधात आवाज उठवला. त्याच्यावरच्या आरोपांमुळे साजिदची ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटामधून ऐनवेळी हकालपट्टी झाली होती. आता साजिद बिग बॉसच्या घरात दाखल होताच, पुन्हा एकदा त्याच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) पुन्हा एकदा साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

शर्लिनने ट्वीट करत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ‘साजिद खानने मला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवत 0 ते 10 असं रेटिंग दे असं म्हटलं होतं. आता मी बिग बॉसच्या घरात जाऊन त्याला रेटींग देऊ इच्छिते.  विनयभंग करणाºया व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे,’असं ट्वीट तिने केलं आहे. इतकंच नाही तर या ट्वीटमध्ये तिने सलमान खानला टॅग केलं आहे. सलमान, ठोस भूमिका घे, असं तिने म्हटलं आहे.

काही वर्षांपूर्वी शर्लिनने  साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘फिल्मीबीट’ला दिलेल्या मुलाखतीत तिने साजिदच्या ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीवर संताप व्यक्त केला. ‘साजिदने सलमान खानच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विनयभंग केला असता, तर त्याने अशा व्यक्तीला  बिग बॉसच्या घरात एन्ट्री दिली असती का? ज्या महिलांनी साजिद खानच्या विरोधात  आवाज उठवला त्यांच्या भावनांचं काय?’, असा सवाल तिने केला.

 साजिद खानची बिग बॉसच्या एन्ट्री झाल्यापासूनच त्याला शोमधून काढून टाकण्याची मागणी होत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी याविरोधात भाष्य केलं आहेत. अर्थात काही त्याला सपोर्ट करणाºयाही आहेत. राखी सावंत आणि कश्मिरा शाहने साजिदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :साजिद खानशर्लिन चोप्राबिग बॉस