Join us  

Soundarya Sharma: साजिद खानसोबतच्या डेटींगच्या बातम्यांमुळे भडकली सौंदर्या शर्मा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 1:19 PM

साजिद खान (Sajid Khan ) व सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma ) दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती....

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धकांची चर्चा मात्र अजूनही सुरू आहेत. अनेक स्पर्धक वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहेत. साजिद खान (Sajid khan ) व सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma ) भलत्याच कारणानं चर्चेत आहेत. होय, दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. शोमध्ये दोघांचं चांगलं बॉन्डिंग दिसलं होतं. शो संपल्यानंतर सौंदर्या, साजिद व अन्य स्पर्धक पार्टी करताना दिसले होते. इतकंच नाही पार्टीत साजिद व सौंदर्या एकत्र पोझ देताना दिसले होते. साहजिकच यानंतर दोघांच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला होता. आता या सगळ्यावर सौंदर्याची प्रतिक्रिया आली आहे. होय, साजिद व तिच्या डेटींगच्या बातम्यांवर सौंदर्या चांगलीच भडकली आहे.आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सौंदर्या या सगळ्या प्रकरणावर बोलली.

  काय म्हणाली सौंदर्या?साजिदसोबत माझं नाव जोडणं यापेक्षा दु:खद काहीही नाही. या बातम्या ऐकूनच मी दुःखी झाले आहे. साजिद यांच्याकडे मी नेहमीच एक भाऊ, मित्र व मेन्टॉर म्हणून पाहिलं. आजही एखाद्या महिलेचं नाव एका व्यक्तीबरोबर जोडलं जातं आणि तिला बोललं जातं यापेक्षा दुर्दैवी काही नाही. आम्ही कोणाला डेट करत आहोत, यापेक्षा आम्ही काय मिळवलंय हे लोकांनी पाहायला हवं, अशा शब्दांत सौंदर्यानं आपला संताप बोलून दाखवला.

कशी पसरली अफवा..साजिद व सौंदर्याच्या डेटींगच्या अफवा कशा पसरल्या, हेही समोर आलं आहे. खुद्द सौंदर्याने याबाबत खुलासा केला. काही पत्रकारांनी या खोट्या बातम्या पेरल्या. मी त्यांना मुलाखत दिली नाही, त्यामुळे त्यांनी अशा बातम्या पेरल्या. या बातम्यांनी मला एकटीलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही त्रास झाला. अशा गोष्टी भविष्यात पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा करते, असंही सौंदर्या म्हणाली. बिग बॉसच्या घरात असताना सौंदर्या गौतमशी रोमान्स करताना दिसली होती. पण शोमध्ये दाेघांचं ब्रेकअप झालं होतं.  

टॅग्स :साजिद खानबिग बॉस