Join us  

अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉसमध्ये करणार राडा, मराठी शोवेळी झाली होती त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 2:13 PM

Abhjeet Bichukale : अभिजीत बिचुकले वीकेंड वारमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता.

रिअॅलिटी शो बिग बॉस १५ (Bigg Boss 15) मध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व अभिजित बिचुकलेची (Abhijeet Bichukale) एन्ट्री होणार आहे. आापल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिजीत बिचुकले वीकेंड वारमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. तिथेही त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

अभिजीत बिचुकलेने मराठी बिग बॉस शोचा स्पर्धक असताना तुरूंगाची हवा खाल्ली होती. चेक बाउंस प्रकरणात अभिजीत बिचुकले याला तुरूंगात जावं लागलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे अभिजीत बिचुकले याला पोलीस बिग बॉस मराठी  २ च्या सेटवरून घेऊन गेले होते.

अभिजीत विरोधात सातारा कोर्टाकडून अटक वॉरंट जारी झालं होतं. त्यामुळे सेटवर येऊन पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि सोबत घेऊन गेले होते. ज्या केसमध्ये बिचुकले याला अटक करण्यात आली होती ते प्रकरण २०१५ मधील  होतं. तो कोर्टात हजर न राहिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. 

अभिजीत बिचुकले याची आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे त्याने नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंतच्या निवडणुसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. पण त्याला कधीही जिंकता आलं नाही. तो बिग बॉसमध्ये आपल्या वाईट भाषेसाठी आणि जबरदस्ती गोंधळ करण्यासाठी चर्चेत होता. आता तो सलमान खानच्या शोमध्ये काय धमाल करणार हे बघणं महत्वाचं ठरेल. 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस