Join us  

Bigg Boss 15:  हद कर दी आपने...! रश्मी देसाई व उमर रियाज यांच्यात ‘इश्क वाला लव्ह’?  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 12:36 PM

‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) गेल्याच आठवड्यात रश्मी देसाईची (Rashami Desai ) वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि एन्ट्री होऊन दोन दिवस होत नाही तोच, बिग बॉसच्या घरात ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ सुरू झाली.

बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) गेल्याच आठवड्यात रश्मी देसाईची (Rashami Desai ) वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि एन्ट्री होऊन दोन दिवस होत नाही तोच, बिग बॉसच्या घरात ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ सुरू झाली. होय, घरात येताच रश्मी व उमर रियाज (Umar Riaz) यांची जवळीक वाढताना दिसतेय. दोघं एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवताना दिसताहेत. अशात रश्मी व उमरचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओत रश्मी उमरला ‘नको तिथे’ स्पर्श करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून रश्मी व उमर यांच्यात काहीतरी शिजत असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं आहे.

काहींना रश्मी व उमरची बॉन्डिंग आवडलीय. पण अनेकांनी हे सगळं फेक असल्याचं म्हटलं आहे. दोन दिवसांत प्रेम वगैरे होऊ शकत नाही, असं चाहत्यांचं मत आहे. अनेकांनी यावरून दोघांना ट्रोलही केलं आहे. शोमध्ये लव्ह अँगल दाखवण्यासाठीच रश्मी देसाईची एन्ट्री झाली, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.

तशी रश्मी देसाई व उमर यांची मैत्री बरीच जुनी आहे. दोघंही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात. बिग बॉस 13 संपल्यानंतर असीम रियाजने रश्मी व उमरची ओळख करून दिली होती. रश्मी, उमर, हिमांशी खुराणा, असीम रियाज असे चौघे पार्टी करताना दिसले होते. तेव्हापासून लोकांनी उमर व रश्मीचं नाव जोडणं सुरू केलं होतं.सध्या बिग बॉस 15 च्या घरात तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा हे लव्हबर्ड्स आहेतच. पण आता त्यांच्या जोडीला रश्मी व उमरचीही चर्चा सुरू झाली आहे. दोघांत काय सुरू आहे, हे नव्या एपिसोडसोबत कळेलंच.

टॅग्स :बिग बॉसरश्मी देसाई