Join us  

OMG! आंघोळ करत होती विधी पांड्या, प्रतिकने तोडला बाथरूमचा लॉक,‘Bigg Boss 15’मध्ये नवा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 12:20 PM

Bigg Boss 15चा प्रीव्ह्यू प्रोमो जारी करण्यात आला आहे आणि तो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

ठळक मुद्देबिग बॉस 15 मध्ये एकापेक्षा एक भारी स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे.

बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) कालच्या एपिसोडमध्ये चांगलाच राडा झाला. मॅप पूर्ण करण्यासाठी बिग बॉसने स्पर्धकांना एक टास्क दिला. टास्कदरम्यान करण कुंद्राने एक मॅप शोधून काढला. शिवाय प्रतिक सहजपाल (Pratik Sehajpal), शमिता शेट्टी व निशांत भट यांच्यात फूट पाडण्यातही तो यशस्वी झाला. प्रतिक, शमिता व निशांतमध्ये जुंपली अन् करण कुंद्राचा फायदा झाला. शमिताने मॅपचा तुकडा करण कुंद्राला दिला. हे कळताच प्रतिक जाम भडकला. इतका की वॉशरूमचा लॉक तोडण्याचा प्रयत्नही त्याने केला. करणने त्याला रोखले. पण नंतर स्क्रू ड्रायव्हरने त्याने लॉक तोडलाच. इथेच एपिसोडही संपला. तूर्तास आज टेलिकास्ट होणा-या एपिसोडचा प्रीव्ह्यू प्रोमो जारी करण्यात आला आहे आणि तो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

विधी पांड्या (Vidhi Pandya) गार्डन एरियातील एका वॉशरूममध्ये आंघोळ करत असताना प्रतिक सहजपा वॉशरूमचा लॉक तोडतो. विधी वॉशरूममधून आल्यावर करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुशाली व अन्य सर्वांना याबाबत तक्रार करते आणि मग पुन्हा राडा सुरू होतो.

मी आंघोळ करत असताना तू असं कसं करू शकतोस, असा सवाल विधी प्रतिकला करते. तेजस्वी प्रकाशही या भांडणात उडी घेते. भलेही तुझ्या मनात काहीही नसेल, पण एका मुलीसाठी हा सर्व प्रकार फार भयंकर आहे, असं ती प्रतिकला सुनावते. प्रतिक यावरही अरेरावी करतो आणि करण कुंद्राचा पारा चढतो. तो प्रतिकला थेट धमकी देतो. तू कोणत्याही मुलीसोबत असं वागू शकत नाहीस, असं त्याला बजावतो. आता यानंतर काय होतं, ते तर आजच्या एपिसोडमध्येच दिसणार आहे.

बिग बॉस 15 मध्ये एकापेक्षा एक भारी स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. यात जय भानुशाली, विशाल कोटियान, तेजस्वी प्रकाश, साहिल श्रॉफ, करण कुंद्रा, इशान सहगल, अफसाना खान, सिंबा नागपाल, डोनल बिष्ट, अकसा सिंह, आसिम रियायजचा भाऊ उमर रियाज, विधी पंड्या, शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल, मीशा अय्यर,निशांत भट या स्पर्धकांचा समावेश आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनकलर्स