Join us  

Bigg Boss 15: इशान-मायशाच्या Intimacyवर भडकला भाईजान; प्रेक्षकांसमोरच घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 3:51 PM

Bigg boss: सध्या बिग बॉसचं १५ वं पर्व सुरु असून या पर्वातही इशान आणि मायशा ही जोडी त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत येत आहे.

ठळक मुद्देसलमान जे काही बोलतोय ते योग्य असल्याचं म्हणत इशानने त्याची चूक मान्य केली.

बिग बॉस (bigg boss) हा शो कायमच त्यातील वादविवाद, प्रेम प्रकरण यामुळे चर्चेत असतो. आतापर्यंत बिग बॉसच्या झालेल्या प्रत्येक पर्वातील अनेक जोड्या प्रेम प्रकरण आणि त्यांच्यातील जवळीकतेमुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या बिग बॉसचं १५ (bigg boss 15) वं पर्व सुरु असून या पर्वातही इशान (ieshaan sehgaal) आणि मायशा (miesha iyer) ही जोडी त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत येत आहे. अनेकदा या जोडीला कॅमेरासमोर अश्लील चाळे करताना स्पॉट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर यंदाच्या पर्वात स्पर्धकांनी अश्लीलतेच्या सीमा पार केल्याचे आरोपही प्रेक्षकांनी केले आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विकेंड वॉरमध्ये सलमान खानने (salman khan) मायशा आणि इशानची चांगलीच शाळा घेतली आहे.

सलमानने सगळ्यांसमोर केली कानउघडणी

शनिवारी झालेल्या विकेंड वॉरमध्ये सलमानने घरातील प्रत्येक सदस्याची शाळा घेतली. प्रत्येकाला त्याच्या चुका दाखवून त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी त्याने मायशा आणि इशान यांच्यातील Intimacyवरही मत मांडलं. "तुमच्यातील रोमान्स एका नॅशनल टीव्हीवर पाहणं प्रेक्षकांना कसं वाटतं याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का?  जर भविष्यात तुम्ही परत एकत्र आला नाहीत तर पुढे काय होईल याचा अंदाज आहे का तुम्हाला?",असा प्रश्न सलमान या दोघांना विचारतो.

तुमच्यातील जवळीक टीव्हीवर योग्य दिसत नाही. पण, असं वागताना तुम्ही कन्फर्टेबल असाल तर आम्ही याविषयी काहीच बोलणार नाही. आम्ही कोण तुम्हाला अडवणारे,असं सलमान म्हणाला. इतकंच नाही तर इशान-मायशाच्या व्हायरल झालेल्या किसिंग सीनवरही सलमानने मत मांडलं. 

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ

"जर हे नातं खरं असेल तर आयुष्यभर असू दे. पण जर पुढील १०-१५ वर्षात हे नातं संपुष्टात आलं तर सोशल मीडियावर ते कसं वाटेल? जर तुमचं एकमेकांसोबत लग्न झालं नाही. तुम्ही वेगळे जोडीदार निवडले तर पुढे जाऊन त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केलाय का?"

Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन

दरम्यान, सलमान जे काही बोलतोय ते योग्य असल्याचं म्हणत इशानने त्याची चूक मान्य केली. तसंच या पुढे काळजी घेईन असं आश्वासनही त्याने दिलं.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजन