Join us  

कुठे होती Bigg Bossच्या घराची ‘मालकीण’ अमीषा पटेल? फिनालेकडे का फिरवली पाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 4:10 PM

‘बिग बॉस 13’च्या धमाकेदार फिनाले रंगला. सिद्धार्थ शुक्ला विजेता झाला. पण खरी चर्चा झाली ती अमीषा पटेलची.

ठळक मुद्दे प्रीमिअरमध्ये अमीषाचे जोरदार स्वागत झाले होते. असे असताना फिनालेत तिचा सगळ्यांना विसर पडेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

बिग बॉस 13’च्या धमाकेदार फिनाले रंगला. सिद्धार्थ शुक्ला विजेता झाला. पण खरी चर्चा झाली ती अमीषा पटेलची. होय, ‘बिग बॉस 13’च्या सुरुवातीला बिग बॉसच्या घराची मालकीण म्हणून अमीषाने शोमध्ये एन्ट्री घेतली होती. यंदा ‘बिग बॉस 13’चा सेट लोणावळ्यावरून मुंबईच्या फिल्म सिटीत शिफ्ट झाला होता. याचाच आधार घेत मेकर्सनी अमीषाला बिग बॉसच्या घराची मालकीण म्हणून दाखवले होते.

‘बिग बॉस 13’च्या प्रीमिअरमध्ये अमीषाची ग्रॅण्ड एन्ट्री झाली होती. पहिल्या वीकमध्ये अमीषा अनेकदा बिग बॉसच्या घरात दिसली.  पण उणापुरा आठवडा होत नाहीच तो अमिषाची ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहून लोक कंटाळले. सुरुवातीच्या दोन दिवसांत अमिषाने  बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी टास्क दिलेत. यादरम्यान स्पर्धकांनीही मस्ती केली. मात्र अमिषाचे वारंवार घरात येणे, प्रेक्षकांना रूचले नाही. मग काय, यानंतर अचानक अमीषा बिग बॉसमध्ये दिसणे बंद झाले. यानंतर अनेकदा अमीषा पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार, अशा बातम्या आल्यात. पण असे काहीही झाले नाही. विशेष म्हणजे गत रात्री बिग बॉसच्या फिनालेमध्येही ती दिसली नाही. हे पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले.

अमीषा बिग बॉसच्या फिनालेला नव्हती तर कुठे होती, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. अमीषाचे इन्स्टा प्रोफाईल पाहिले असता, ती शनिवारी रात्री मुंबईतच होती, हे स्पष्ट झाले. दिल्लीच्या अडीच आठवड्यांच्या ट्रिपनंतर शनिवारीच ती मुंबईत परतली होती. मुंबईत आल्या आल्या ती एका इव्हेंटसाठी रवाना झाली. यानंतर रविवारी अहमदाबादला पोहोचली.

खरे तर प्रीमिअरमध्ये अमीषाचे जोरदार स्वागत झाले होते. असे असताना फिनालेत तिचा सगळ्यांना विसर पडेल, असे कुणालाही वाटले नव्हते. बॉलिवूडची अजब दुनिया म्हणातात ती यालाच.

टॅग्स :अमीन पटेलबिग बॉस