इंडियन एक्स्प्रेसबरोबर बोलताना बंदगीने म्हटले की, पुनीश आणि माझ्यात जे काही घडले त्याविषयी मला काहीही पश्चात्ताप होत नाही. मी अखेरपर्यंत पुनीशची प्रतीक्षा करणार. कारण मला असे वाटते की, त्याने विजेता ट्रॉफी घेऊनच घराबाहेर पडावे. यावेळी तुम्हा दोघांचे ब्रेकअप झाले काय? असे जेव्हा बंदगीला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, आम्ही दिवसातून कित्येकदा एकमेकांना चेष्टामस्करीत ब्रेकअप झाल्याचे म्हणत होतो. यावर घरातील सदस्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणे हाच आमचा उद्देश होता. मी त्याच्याशी ब्रेकअप का बरं करू? मी तर त्याच्यावर खरे प्रेम करते.
ज्या लोकांना असे वाटत आहे की, बंदगीने बॉयफ्रेंड डेनिस नागपालला पुनीशमुळे धोका दिला आहे, अशा लोकांना उत्तर देताना बंदगीने म्हटले की, ‘डेनिसबद्दल सांगायचे झाल्यास मी बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच त्याच्याशी ब्रेकअप केले होते. मी घरात असल्यामुळे तो माझ्याबद्दल बरेच काही बोलत होता. माझ्या घरमालकाने मला घराबाहेर काढल्याच्या चुकीच्या बातम्याही पसरविण्यात आल्या. खरं तर मी जेव्हा सोसायटीत गेली तेव्हा प्रत्येकाने माझे स्वागत केले, असा दावाही बंदगीने केला.