सुत्रानुसार, सर्वात अगोदर पुनीश शर्मा विजेत्यांच्या रेसमधून बाहेर पडला. त्यानंतर विकास गुप्ता याला देखील कमी वोट मिळाल्याने, त्याला या रेसमधून बाहेर पडावे लागले. अखेर ड्रामा क्वीन हिना खान आणि बिग बॉसच्या घरातील मॉँ शिल्पा शिंदे यांच्यात टसन सुरू झाली. शिल्पा शिंदेने सुरुवातीपासून आघाडी घेत बिग बॉसचा ताज आपल्या नावे केला. ट्विटरवर ही बातमी वाºयासारखी पसरत आहे.
खरं तर बिग बॉसच्या घरात शिल्पा शिंदेचा प्रवास खूपच अविस्मरणीय असा राहिला आहे. तिने पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते. तिचा आणि विकास गुप्ताचा वाद संपूर्ण सीजनमध्ये चर्चेचा विषय बनला. ऐवढेच नव्हे तर फिनालेच्या एक दिवस अगोदर विकास गुप्ताने तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन हे स्पष्ट केले की, त्यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री असून, शोबाहेरही ती कायम राहणार आहे. वास्तविक सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटीजनेही शिल्पाला पाठिंबा दर्शविला होता. विन्दू दारा सिंग, डॉली बिंद्रा यांच्यासह शिल्पाचा एक्स बॉयफ्रेंड रोमित राज यानेही शिल्पाचा पाठिंबा देताना तिचे कौतुक केले होते. दरम्यान, शिल्पाला बिग बॉसच्या किताबासह ५० लाख रूपयांचा धनादेश तसेच कलर्सचे तीन शो मिळण्याची शक्यता आहे. फिनालेच्या दोन दिवस अगोदर शिल्पाचा भाऊ आशुतोषने चाहत्यांसाठी एक ट्विटर अकाउंट ओपन केले होते. जे काही वेळातच हजारोंच्या संख्येने फॉलो केले गेले.