दरम्यान, अंतिम स्पर्धकांमध्ये असलेल्या पुनीश शर्मा, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि हिना खान या चार स्पर्धकांपैकी सर्वात अगोदर पुनीश शर्मा विजेत्यांच्या रेसमधून बाहेर पडला. त्यानंतर विकास गुप्ता याला देखील कमी वोट मिळाल्याने, त्याला या रेसमधून बाहेर पडावे लागले. अखेर ड्रामा क्वीन हिना खान आणि बिग बॉसच्या घरातील मॉँ शिल्पा शिंदे यांच्यात विजेते पदासाठी टक्कर झाली. लाइव्ह वोटिंगमध्ये शिल्पा शिंदेने सुरु वातीपासून आघाडी घेत बिग बॉसचा ताज आपल्या नावे केला. ट्विटरवर ही बातमी सध्या वाºयासारखी पसरत आहे.
ALSO READ : Bigg Boss 11 Winner : अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदे बनली ‘बिग बॉस ११‘ची विनर!!
खरं तर बिग बॉसच्या घरात शिल्पा शिंदेचा प्रवास खूपच अविस्मरणीय असा राहिला आहे. तिने पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते. तिचा आणि विकास गुप्ताचा वाद संपूर्ण सीजनमध्ये चर्चेचा विषय बनला. ऐवढेच नव्हे तर फिनालेच्या एक दिवस अगोदर विकास गुप्ताने तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन हे स्पष्ट केले की, त्यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री असून, शोबाहेरही ती कायम राहणार आहे.
}}}} ">http://
}}}} ">Shilpa Shinde walks away with the title of Bigg Boss season 11. #BB11Finalepic.twitter.com/FA86NCj5zM— COLORS (@ColorsTV) January 14, 2018
वास्तविक सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटीजनेही शिल्पाला पाठिंबा दर्शविला होता. विन्दू दारा सिंग, डॉली बिंद्रा यांच्यासह शिल्पाचा एक्स बॉयफ्रेंड रोमित राज यानेही शिल्पाचा पाठिंबा देताना तिचे कौतुक केले होते. दरम्यान, शिल्पाला बिग बॉसच्या किताबासह ५० लाख रूपयांचा धनादेश तसेच कलर्सचे तीन शो मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाने हा शोचा किताब जिंकल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून सध्या सर्वत्र जल्लोष केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.