Join us

Bigg Boss 11:हे आहेत सलमान खानचे आवडते शेजारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 09:47 IST

बिग बॉस सीझन-11 1 ऑक्टोबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. त्यामुळे बिग बॉस-11ची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या ...

बिग बॉस सीझन-11 1 ऑक्टोबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. त्यामुळे बिग बॉस-11ची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण असणार, शो कसा असेल, बिग बॉसचे घर कसे असेल असे अनेक प्रश्न रसिकांच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बिग बॉस-11चं शानदार आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी दबंग अभिनेता सलमान खान चांगलाच थिरकला. प्रत्येक सीझनवेळी बिग बॉस हा शो कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित असतो. यंदासुद्धा हा शो एका वेगळ्या थीमवर आधारित असणार आहे. यंदाच्या बिग बॉसमध्ये पडोसी म्हणजेच शेजारी ही थीम असणार आहे. या अनोख्या आणि वेगळ्या थीमच्या माध्यमातून बिग बॉस-11 रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास यावेळी सलमान खानने व्यक्त केला. या शोच्या माध्यमातून रसिकांचं तुफान मनोरंजन होईल असं सलमानला वाटत आहे. दरवेळीप्रमाणे यंदाही सेलिब्रिटींसह सामान्य जनतेमधील प्रतिनिधीसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल होतील. बिग बॉसच्या लॉन्चिंगच्या वेळी सलमान खानला त्याचे बेस्ट पडोसी म्हणजे आवडते शेजारी कोण असा प्रश्न विचारण्यात आला. क्षणाचाही विलंब न लावता सलमानने यावर उत्तर दिलं. आपल्या आवडते शेजारी म्हणजे आपले आई-वडिल आहेत असं सलमानने यावेळी सांगितले. आपले आई-वडिल हे आपल्याच अपार्टमेंटमध्ये राहत असून खालच्या मजल्यावरच राहतात. तेच आपले आवडते शेजारी आहेत असं सलमानने अभिमानाने सांगितले आहे. सलमानच्या जीवनात त्याच्या आई-वडिलांचे वेगळे स्थान आहे हे कायमच त्याने सांगितले आहे. आता आपले आवडते पडोसीसुद्धा आपले आई वडिलच असल्याचा खुलासाही सलमानने केला आहे. Also Read:बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटीछोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसमध्ये सामील होण्याची अनेकांची इच्छा असते. आता बिग बॉस-11 येत्या रविवारपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमध्ये कोण कोण सेलिब्रिटी असणार, सामान्य जनतेमधील कोण कोण प्रतिनिधी असणार याबाबतच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यासाठी रसिकांना काही तास प्रतिक्षा करावी लागणार असंच दिसतंय.