रेमेडियोजने सांगितलेल्या माहितीनुसार, अर्शी खानला नाइटी घालायला खूप आवडतात. त्यामुळेच तिच्याकडे ५०० पेक्षा अधिक नाइटींचे कलेक्शन आहे. जेव्हा अर्शी घरी असते अन् कोणी गेस्ट येणार नसतील तर अर्शी नाइटी घालून घरात वावरणे पसंत करते. आश्चर्याची बाब म्हणजे अर्शी खानने ‘काफ्तान-लाइफ नाइटीज्’ नावाने एक ब्रॅण्डही लॉन्च केला होता. परंतु पुरेसा फंड नसल्याने अन् नॅशनल मार्केटिंगकडून फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने तिचा हा ब्रॅण्ड फारसा यशस्वी झाला नाही.
आता अरब देशात किंवा अफगानिस्तानमध्ये काफ्तानचा कोट ओवरड्रेससारखा परिधान केला जातो. मात्र काहीही असो, सध्या अर्शी खानची नाइटीज् प्रचंड लोकप्रिय झाली असून, त्याचीही सध्या चर्चा रंगत आहे. कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अर्शीच्या या नाइटीज् ब्रॅण्डला मदतही मिळण्याची शक्यता आहे.