या एमएमएसच्या एका फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, शिल्पा शिंदेसारखीच दिसणारी एक तरुणी एका व्यक्तीसोबत बेडवर झोपलेली आहे. असे म्हटले जात आहे की, बिना मेकअपमध्ये असलेली ही तरुणी शिल्पा शिंदे आहे. मात्र याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा नाही. यावर शिल्पाने स्वत:च सांगितले की, जी मुलगी माझ्यासारखी दिसते ती हिंदी पोर्न अभिनेत्री आहे. जी बिनामेकअप माझ्यासारखी दिसत आहे, तर विकास गुप्ताच्या मते, शिल्पाने हा आरोप लावला की, हा एमएमएस तेव्हा काढण्यात आला जेव्हा शिल्पा ‘भाभीजी घर पर हंै’ या मालिकेतून बाहेर पडली होती. मात्र शिल्पाने स्पष्ट केले की, ‘मी यावरून कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु असे असू शकते की, भाभीजीचे निर्मात्यांनीच मला ब्लॅकमेल करण्यासाठी हा एमएमएस बनविला असावा.
गेल्या वीकेण्डमध्ये जेव्हा विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदेमध्ये वाद रंगला होता तेव्हा तेव्हा शिल्पा शिंदेने पार्थ समथान या नावाचा उल्लेख केला. हे नाव ऐकताच विकास गुप्ता संतापला होता. त्याने शिल्पा शिंदेला धमकी देताना तुझेही कांड एक्सपोज करेल असे म्हटले होते. असे म्हटले जाते की, विकास गुप्ता शिल्पाचे जे गुपित जाणून आहे ते तिच्या लग्नाशी संबंधित आहे. शिल्पा शिंदे सुरुवातीला तिचा को-स्टार रोमती राज याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे लग्न होणार होते. सर्व तयारीदेखील झाली होती. मात्र ऐनवेळी शिल्पा आणि राज यांचे नाते तुटले. त्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही. पुढे रोमतीने लग्न केले, परंतु शिल्पा अजूनही एकाकी जीवन जगत आहे.