दरम्यान, सोमवारच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिल्पा किचन एरियामध्ये लव त्यागी, हितेन तेजवानी आणि पुनीश शर्माला सांगताना दिसली की, प्लीज आकाशला सांगा की, मला स्पर्श करू नकोस. कारण मला त्याचा स्पर्श इरिटेटिंग वाटत आहे. यावर हितेन म्हणतो की, शिल्पाजी हे तुम्हालाच त्याला सांगावे लागेल. यावर शिल्पा म्हणते की, मी त्याला बºयाचदा हे सांगितले परंतु तो यास चेष्टामस्करी समजतो. हितेन पुन्हा म्हणतो की, तूच त्याला याविषयी सांगायला हवे. पुढे शिल्पा म्हणते की, सुरुवातीला त्याचा स्पर्श वेगळा होता, परंतु आता त्याचा स्पर्श वेगळा आहे. त्यामुळे मला त्याचे हे वागणे अजिबात सहन न होणारे आहे. शिल्पाचे हे शब्द ऐकून लव आकाशला याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला म्हणतो की, शिल्पाजी आपल्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. त्यामुळे तिला हे सर्व चांगले वाटत नाही. तू तिला स्पर्श करू नकोस. लवचे हे शब्द ऐकून आकाश म्हणतो की, आता मी तिला स्पर्श करणार नाही. यासाठी शिल्पा लवचे आभारही मानते.
याच विषयावर काही वेळानंतर हिना खान, अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यात चर्चा होती. हिना म्हणते की, शिल्पा वयाने खूप मोठी आहे, शिवाय स्ट्रॉन्गही आहे. त्यामुळे तिने स्वत:च याविषयी आकाशला सांगायला हवे. मात्र मध्येच लव म्हणतो की, तो तिचे म्हणणे ऐकत नाही त्यामुळेच मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना विकास म्हणतो की, मी पहिल्यादा शिल्पाच्या तोंडून हे ऐकले की, सुरुवातीला तिला हे सर्व चांगले वाटत होते, परंतु आता तसे वाटत नाही. यावर अर्शी म्हणते की, गेल्या दहा आठवड्यांपासून शिल्पा आणि आकाश एकमेकांना स्पर्श करीत आहेत. आता अचानकच ११व्या आठवड्यात तिला आकाशचा स्पर्श का नकोसा वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशने शिल्पाला बळजबरीने किस केले होते. तेव्हापासून शिल्पा आकाशच्या या स्वभावामुळे वैतागली आहे.