Bigg Boss11: भाभीजीच्या एक्स बॉयफ्रेंडची होणार एंट्री,पाहायला मिळणार ठरलेले लग्न मोडलेल्या शिल्पा शिंदेच्या लग्नाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:38 IST
इंडस्ट्रीत आजही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे तरीही लग्नबंधनात अडकलेले नाहीत.त्यांनी लग्नाला महत्त्व न देता आपल्यानुसार ...
Bigg Boss11: भाभीजीच्या एक्स बॉयफ्रेंडची होणार एंट्री,पाहायला मिळणार ठरलेले लग्न मोडलेल्या शिल्पा शिंदेच्या लग्नाची गोष्ट
इंडस्ट्रीत आजही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे तरीही लग्नबंधनात अडकलेले नाहीत.त्यांनी लग्नाला महत्त्व न देता आपल्यानुसार आयुष्य एन्जॉय करतायेत.या यादीत आता अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदेही गणली जात आहे.काही वर्षापूर्वी शिल्पा शिंदेचे लग्न अभिनेता रोमित राजसोबत ठरले होते.इतकेच नाहीतर लग्नाच्या आमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या.काही कारणामुळे रोमितसह शिल्पाने जमलेले लग्न मोडले.यानंतर रोमितने टीना कक्कडसोबत लग्न करत संसार थाटला.‘मायका’ आणि ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’ या मालिकेत शिल्पा आणि रोमित दोघांनी एकत्र काम केले आहे होते. मात्र आताएक्स बॉयफ्रेंड रोमित राजसोबत पुन्हा एकदा भाभीजी शिल्पा शिंदे झळकणार आहे.कारण बिग बॉसच्या घरात लवकरच रोमितची एंट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात सध्या शिल्पा आणि विकासमध्ये रंगलेला वाद पाहायला मिळत आहे. 'भाभीजी घर पर है' मालिकेतून विकासमुळेच शिल्पाला तो शो सोडावा लागला असल्याचे कारण देत या दोघांमध्ये रोज चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळतो.शिल्पामुळे विकास खूप हैराणही झाला आहे.शिल्पा त्याचा खूप मानसिक छळ करत असल्याचे सांगत त्याने दोनदा बिग बॉसच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.शिल्पा सध्या विकासकडून तिच्या प्रत्यक्ष जीवनात झालेल्या त्रासाचा बदलाच घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र प्रत्यक्ष जीवनात फक्त विकास शिल्पाचा कट्टर शत्रु नसून रोमितही मोठा शत्रु आहे.त्यामुळे आता रोमितची एंट्री झाल्यानंतर शिल्पाचे रोमितसह ठरलेलं लग्न का मोडले याचेही रहस्य उलगडले जाणार असल्यामुळे हा शो अधिक रंजक वळणारवर येणार आहे. त्यामुळे शिल्पा शिंदेची रिल लाईफ ते रिअल लाईफ असा प्रवास बिग बॉसच्या घरात उलगडला जाणार आहे.शिल्पा बाहेर होती तोपर्यंत काही गोष्टींमुळे या दोघांचा सुड घेऊ शकली नाही.त्यामुळे तिला या दोघांवर आगपाखड करण्यासाठी चांगलीच संधीच मिळाली आहे.त्यामुळे वर्षोनवर्ष साठवून ठेवलेल्या राग लवकरच छोट्या पडद्यावर शिल्पा शिंदे व्यक्त करताना दिसणार आहे.त्यामुळे एक नाही तर दोन - दोन शत्रुंचा सामना शिल्पा शिंदे करणार म्हटल्यावर हा शो अधिक रंजक होणार हे मात्र नक्की.