होय, आम्ही प्रियांक शर्मा याच्याविषयी तुम्हाला सांगत आहोत. एका अनसीन व्हिडीओमध्ये प्रियांक शर्मा हिनासोबत अतिशय विचित्र वागताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, हिना खान, प्रियांक शर्मा आणि अर्शी खान बेडरूममध्ये बसले होते. तिघेही कुठल्यातरी विषयांवर बोलत होते. याचदरम्यान हिना प्रियांकला शांत राहण्यास सांगताना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की, ती त्याच्यानंतर बोलणार आहे. मात्र याचदरम्यान प्रियांक तिला थम्स अप करण्याऐवजी मधले बोट दाखविताना दिसत असल्याने त्याचा भलताच अर्थ समोर येतो. खरं तर प्रियांकचा हा इशारा अश्लीलपणाचा असल्याने हिनासह घरातील सर्वच सदस्य चक्रावून जातात.
त्यामुळे सगळेच प्रियांकला त्याच्या या अश्लीलपणाबद्दल जाब विचारतात. प्रियांकदेखील नेहमीप्रमाणे माझ्याकडून चूक झाल्याचे मान्य करतो. यात आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेला हिना अजिबातच गांभीर्याने घेत नाही. आता हा प्रश्न निर्माण होत आहे की, प्रियांकने अशाप्रकारचा इशारा जाणूनबुजून केला की त्याच्याकडून चूक झाली? त्यामुळे आगामी काळात प्रियांक आणि हिना खानमध्ये याच मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.