चाहत्यांच्या मते, अशाप्रकारची एलिमिनेशन प्रोसेस व्हायला नको. लव दिल्लीचा रहिवासी आहे. अशात मुंबईमध्ये त्याला कमी मते मिळतीलच, असाही आरोप त्याच्या चाहत्यांनी केला. त्याचबरोबर ‘अन्फॅरिडिसिशन लव’ असा ट्रेण्डही होत आहे. चाहत्यांचा लवप्रतीचा हा उत्साह बघून एक गोष्ट निश्चित समजली जात आहे, ती म्हणजे त्याची लोकप्रियता जबरदस्त आहे.
}}}} ">If the votings are based on what they planned considering limited place why the hell we are watching the fake show giving trp to it #BiasedBiggBoss#BiggBoss11#UnfairDecisionForLuv#SupportLuvTyagi#luv tyagi #ColorsTV#Endemolshineindia— kazol baral (@BaralKazol) January 6, 2018
खरं तर लवच्या चाहत्यांनी रोष व्यक्त करणे स्वाभाविक आहे. कारण तीन सेलिब्रिटींमध्ये एक कॉमनर असल्याने ही फाइट एकतर्फी होईल, असे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. दरम्यान, घरात आता आकाश ददलानी आणि पुनीश शर्मा हे दोन कॉमनर आहेत. आता हे दोघे कुठपर्यंत मजल मारतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहेत. बिग बॉसच्या सीजन १० चा विनर मनवीर गुर्जर हा कॉमनर होता. अशातही पुनीश आणि आकाशला चांगली संधी आहे. परंतु यावेळेस असे होण्याची शक्यता फारच धूसर आहे.