Join us

Bigg Boss 11 : ​बिग बॉसच्या घरात 'खुल जा सिम सिम...' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 16:15 IST

मंगळवार, २४ आॅक्टोबर रात्रीची वेळ होती. मेहजबीन आपल्या बेडवर झोपून सर्व स्पर्धकांना एकटक पाहत होती. तिला पाहून स्पर्धक म्हणतात ...

मंगळवार, २४ आॅक्टोबर रात्रीची वेळ होती. मेहजबीन आपल्या बेडवर झोपून सर्व स्पर्धकांना एकटक पाहत होती. तिला पाहून स्पर्धक म्हणतात की, ‘मेहजबीनच्या अंगात भूत आलेले आहे.’ हिना, अर्शी आणि बेन तिच्याकडे पाहून घाबरतात आणि देवाकडे प्रार्थना करतात. त्यांना असे वाटते की खरच तिच्या अंगात भूत आलेले आहे. हिना तिच्या जवळ जाऊन तिला पाणी विचारते. त्यानंतर आकाश व हिना तिच्यावर हसतात आणि तिला उद्देशून म्हणतात की, ‘मेहजबीन आंटी, आता ठिक आहेत काय?’ काही वेळानंतर मेहजबीन नॉर्मल होते तेव्हा दोघेही तिच्यावर पुन्हा हसतात आणि म्हणतात की, ‘आंटी आता ठिक आहेत.’ काही वेळानंतर कॅप्टन एक टास्क देतात, ज्याचे नाव आहे ‘खुल जा सीम सीम..’ हे टास्क खेळण्यासाठी हाऊसच्या गार्डन एरियात फुल जंगल बनविलेले असते आणि जंगलाच्या आत जाण्यासाठी एक मानवी खोपडीसारखा दरवाजा बनविलेला असतो. या टास्कमध्ये ब्लू आणि रेड अशा दोन टीम बनविलेल्या आहेत. टास्कनुसार दरवाजाच्या आत अगोदर एका टीमच्या स्पर्धकांना आत शिरायचे आहे आणि दुसऱ्या टीमने त्यांना अडवून त्यांचे जगणे मुश्किल करायचे आहे. टास्कला सुरुवात होते. ब्लू टीमचा स्पर्धक आकाश हिना आणि शिल्पावर पाणी फेकतो. पाण्याचे रुपांतर चिखलाच्या पाण्यात होते. हिना जेव्हा बंदगीच्या तोंडावर चिखलाचे पाणी फेकते तेव्हा पुनिश चवताळतो आणि तो हिनाच्या तोंडावरही पाणी फेकतो. त्यानंतर आकाश आणि पुनिश हिनावर जास्त चवताळतात आणि एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात.  आकाश गार्डन एरियातील झोपायच्या गाद्यांवर पाणी टाकताना दिसतो. अर्शी आणि आकाश प्लॅनिंग करतात की, आपणही झोपायचे नाही आणि कुणालाही झोपू द्यायचे नाही. त्यानंतर अर्शी पूजा आणि मेहजबीनला पटवायचा प्रयत्न करते की, ‘जेव्हा गुफेचा दरवाजा उघडले तेव्हा मी तुमच्याबरोबर येईल’, मात्र दोघांपैकी कोणीही तयार होत नाही. मेहजबीन दिवाळी आॅफरमध्ये गिफ्ट घेऊ शकली नव्हती, आणि आता तिला नेमकी हिच आॅफर दिली जाते त्यातच तिच्या घरु न आलेले गिफ्ट घेऊन गुफेच्या दरवाज्यातून आत जायायचे आहे. याचाच अर्थ तिचे टास्क हरणे होय. मात्र ती या निर्णयावर तटस्थ असते आणि आपल्या टीमसोबतच उभी राहते. असा होता आजचा दिवस.